लंडन : इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक याने संघाचे कर्णधारपद सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे; मात्र
माजी कर्णधार मायकल वॉन याने कुकची इंग्लंड वन-डे संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, असे म्हटले आह़े
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 3-1ने सरशी साधली होती़ त्यामुळे टीकाकारांनी इंग्लंड संघावर स्तुतिसुमने उधळली होती; मात्र सध्या सुरू असलेल्या
वन-डे मालिकेत इंग्लंड टीम भारताविरुद्ध क्-3ने पिछाडीवर पडली आह़े त्यामुळे कुकच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला
जात आह़े
वॉन याने द टेलिग्राफमधील आपल्या कॉलममध्ये लिहिले,
की इंग्लंड संघाने कसोटीत उत्कृष्ट खेळ केला, याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत़ मात्र, वन-डे हा वेगळा क्रिकेट प्रकार आहे, याची कुकला जाण असायलाच पाहिज़े मात्र, तो योग्य निर्णय घ्यायला तयार नसेल, तर त्याची संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करायला हवी़’
भारताविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेत इंग्लंड संघात अनेक बदल करण्याची गरज आहे, हे इंग्लंड संघ व्यवस्थापक जेम्स विटकर आणि पॉल डाऊनटन यांना दिसत नाही का? असा सवालही वॉन याने केला आह़े आपल्याच देशात सलग तीन सामन्यांत मात खावी लागणो, ही खूप मोठी गोष्ट आह़े आता कुकबद्दल योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही वॉन याने आपल्या कॉलममध्ये नमूद केले आह़े (वृत्तसंस्था)
च्बर्मिघम : ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये होणा:या आगामी वन डे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेपूर्वी अॅलिस्टर कुकला इंग्लंड संघाच्या कर्णधारपदावरून हटवू नये, असे मत माजी कर्णधार अँड्रय़ू स्ट्रॉस याने व्यक्त केले आह़े