टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला मंगळवारी आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या वन-डे सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे़ भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये सलग ४ सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे़ आता उद्या भारताला आयर्लंडविरुद्ध आणि त्यानंतर झिम्बाब्वेचा सामना करायचा आहे़ या संघांनाही कमी अनुभव असल्यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनी दुखापतीतून सावरलेल्या भुवनेश्वरला संधी देण्याची शक्यता आहे़ अष्टपैलू रवींद्र जडेजा सध्या फ्लॉप ठरत आहे़ त्यामुळे या खेळाडूच्या जागी भुवी खेळू शकतो़
भुवनेश्वरला संधी मिळणार?
By admin | Updated: March 10, 2015 01:13 IST