कुरीतिबा (ब्राझील) : ब्राझील येथे पुढील महिन्यात होणार्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेसाठी आॅस्ट्रेलियचा संघ सर्वांत पहिला पोहोचला आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्याचे थंडे स्वागत केले गेले. व्हिटोरिया विमानतळावर जवळपास १०० ब्राझील प्रशासक आॅस्ट्रेलिया संघाची वाट पाहत होते. परंतु, संघ रात्री उशिरा पोहोचला आणि ते थेट त्याच्या हॉटेलवर पोहोचले. विश्व चषकाच्या संकेतस्थळावरील आॅस्ट्रेलिया संघ त्याचा पहिला सामना १३ जून रोजी चिलीविरुद्ध होणार आहे. ब्राझीलमध्ये क्रोएशिया आणि इराण संग ३ जून रोजी पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरिया, घाना व पोर्तुगाल हे संघ सर्वांत उशिरा ११ जून रोजी दाखल होणार आहेत. (वृत्तसंस्था) ब्राझील संघाने सोमवारी सराव सुरु केला. संघातील खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलियन टीम ब्राझीलला दाखल
By admin | Updated: May 30, 2014 04:18 IST