हैदराबाद : सायना नेहवालच्या वेगळे होण्याच्या निर्णयामुळे काही फरक पडला नसल्याची प्रचिती देताना राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आगामी आशियाई स्पर्धेत भारताच्या पदकांच्या दावेदारांच्या सरावावर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले.
बेंगळुरूमध्ये विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याच्या सायनाच्या निर्णयावर चुप्पी साधणारे गोपीचंद म्हणाले,‘आगामी आशियाई स्पर्धेसाठी खेळाडूंना सज्ज करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.’
नुकत्याच संपलेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकाविणा:या पी.व्ही.सिंधूबाबत बोलताना गोपीचंद म्हणाले,‘सिंधूसाठी हा अविस्मरणीय क्षण होता. गेल्या आठवडय़ात सिंधूने शानदार खेळ केला. मी आजचा दिवस सिंधूला समर्पित करण्यास इच्छुक आहो.’
कोपेनहेगनहून मंगळवारी सायंकाळी येथे दाखल झालेले गोपीचंद म्हणाले,‘माझा विचार करता आशियाई स्पर्धेला केवळ दोन आठवडय़ांचा कालावधी शिल्लक आहे. आशियाई स्पर्धेत सवरेत्तम कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना सज्ज करण्याची जबाबदारी आहे.’
2क्क्1 मध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियन्सचा मान मिळविणारे गोपीचंद म्हणाले,‘विश्व चॅम्पियनशिपमध्ये कडवी प्रतिस्पर्धा होती, पण भारतीय खेळाडूंना यापेक्षा सरस कामगिरी करता आली असती.’
गोपीचंद यांनी सांगितले की,‘ही प्रतिष्ठेची स्पर्धा होती. माङया मते अनेक देश आमच्या बरोबरीत आहे आणि काही थोडे सरस आहेत. आम्हाला चांगली कामगिरी
करता आली असती किंवा पदकाविनाही परतावे लागले असते. त्यामुळे सध्याच्या कामगिरीवर समाधानी आहे. आशियाई
स्पर्धेत चुरस अनुभवाला मिळणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत
भारतीय खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, अशी आशा आहे.’ (वृत्तसंस्था)