शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

२९ साल बाद...

By admin | Updated: November 4, 2016 04:10 IST

भारत २९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत असून, या वेळी क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड संघाचे आव्हान राहणार

नवी दिल्ली : भारत २९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत असून, या वेळी क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड संघाचे आव्हान राहणार आहे. भारताने यापूर्वी १९८६-८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २९ वर्षांनी इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषवत आहे. इंग्लंड संघ बांगलादेशचा दौरा आटोपून भारतात डेरेदाखल झाला आहे. भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान यापूर्वी इंग्लंडच्या यजमानपदाखाली २०१४ मध्ये मालिका खेळली होती. त्या वेळी इंग्लंडने ३-१ ने विजय मिळवला होता. भारतीय संघ यापूर्वी पाच मालिकेत अपराजित असून, या वेळी इंग्लंडविरुद्ध पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे. भारताला २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले होते. भारताने श्रीलंकेला त्यांच्याच देशात २-१, दक्षिण आफ्रिकेला २०१५-१६ मध्ये भारतात ३-० ने, वेस्ट इंडीजला २०१६ मध्ये २-० ने आणि अलीकडेच न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केले आहे. इंग्लंडने १९३३-३४ मध्ये भारताचा प्रथमच दौरा केला होता. त्या वेळी इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली होती. भारत प्रथमच पाच सामन्यांची मालिका १९४७-४८ मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. भारतात १९४८-४९ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध प्रथमच पाच सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने २० वेळा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे. या कालावधीत भारताने पाच अशा मालिकांचे आयोजन केलेले आहे की त्यात सहा-सहा कसोटी सामन्यांचा समावेश होता. गेल्या २९ वर्षांत भारताने दोन, तीन किंवा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध आपल्या यजमानपदाखाली खेळलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील १९५१-५२ ची मालिका १-१ ने बरोबरीत सोडविली, तर १९६१-६२ च्या मालिकेत २-० ने, तर ७२-७३ च्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला. भारताने १९७६-७७ ची मालिका १-३ ने गमावली, तर १९८१-८२ ची मालिका १-० ने जिंकली. भारताला १९८५-८६ च्या मालिकेत १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान आपल्या कसोटी इतिहासातील ९०० वा सामना पूर्ण करणाऱ्या भारताला इंग्लंडविरुद्ध ११२ कसोटी सामन्यांत २१ विजय मिळविता आले, तर ४३ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. ४८ सामने अनिर्णीत संपले. (वृत्तसंस्था)भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १९४८-४९ मध्ये वेस्ट इंडीज, १९५१-५२ मध्ये इंग्लंड, १९५२-५३ मध्ये पाकिस्तान, १९५५-५६ मध्ये न्यूझीलंड, १९५८-५९ मध्ये वेस्ट इंडीज, १९५९-६० मध्ये आॅस्ट्रेलिया, १९६०-६१ मध्ये पाकिस्तान, १९६१-६२ मध्ये इंग्लंड, १९६३-६४ मध्ये इंग्लंड, १९६९-७० मध्ये आॅस्ट्रेलिया, १९७२-७३ मध्ये इंग्लंड, १९७४-७५ मध्ये वेस्ट इंडीज आणि १९७६-७७ मध्ये इंग्लंड यांचे यजमानपद भूषविले आहे. त्यानंतर भारताने १९७८-७९ वेस्ट इंडीज, १९७९-८० मध्ये आॅस्ट्रेलिया व पाकिस्तान, १९८१-८२ मध्ये इंग्लंड व १९८३-८४ मध्ये वेस्ट इंडीज या संघांविरुद्ध प्रत्येकी सहा कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे. भारताने १९८४-८५ मध्ये इंग्लंड आणि १९८६-८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे यजमानपद भूषविले आहे.