कोची : वेगवान गोलंदाज शांताकुमार श्रीसंतला पुनरागमनची आशा आहे. श्रीसंत स्वत:वर असलेली बंदी रद्द करण्यासाठी बीसीसीआयसोबत संपर्क साधणार आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने गेल्या आठवड्यात २०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंत निर्दोष असल्याचा निर्णय दिला.श्रीसंत म्हणाला, ‘मी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बंदीची शिक्षा रद्द करण्यासाठी विनंती करू शकतो, असे म्हटले होते. बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतामुळे मला आशेचा किरण दिसत आहे. ते माझ्या विनंतीचा विचार करतील अशी आशा आहे. त्यामुळे मी विनंती अर्ज पाठविण्यास उत्सुक आहे. मी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांच्या उत्तराची प्रतीक्षा करीत आहे. बीसीसीआयच्या यानंतच्या बैठकीत माझ्याबाबत अनुकूल निर्णय होईल, अशी आशा आहे.’भारतातर्फे कसोटी व वन-डे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीसंतने आपल्या वेदनांना मोकळी वाट करून दिली. मला अटक करण्यात आली व तिहारा तुरुंगात नेण्यात आल्यानंतर कथित प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिम व त्याचा सहकारी छोटा शकिल यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टेबाजी रॅकेटसोबत संबध असल्याचे आरोप करण्यात आले. त्यावेळी मी आत्महत्या करण्याचा विचार करीत होता. ईश्वरावर असलेल्या श्रद्धेमुळे आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे मला यातून सावरण्यास मदत मिळाली, असेही श्रीसंत म्हणालाबीसीसीआयकडून अनुकूल निर्णयाची आशा असल्याचे श्रीसंतने एका उत्तरात सांगितले. श्रीसंत पुढे म्हणाला, ‘माझ्या मार्गात कुठली अडचण असेल असे वाटत नाही. बीसीसीआय एक संस्था आहे, व्यक्ती नाही. बीसीसीआयने जर बंदी हटवली नाही तर न्यायालयाचे दार ठोठावेल. मी कुणाला आव्हान देत नसून प्रतीक्षा करणार आहे. मी क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहो.’जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सोमवारी सराव केल्याचे वृत्त श्रीसंतने फेटाळून लावले. आजीवन बंदीचा निर्णय रद्द झाल्यानंतरच या मैदानावर सराव करणार असल्याचे श्रीसंतने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)मनात आत्महत्येचे विचार घोळत होते : श्रीसंतस्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यावर सुरूवातीच्या काळात आत्महत्येचे विचार येत होते. मात्र भगवान शंकरावरील श्रद्धा आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळेच यातून बाहेर आलो, असे क्रिकेटपटू श्रीसंत याने सांगितले.श्रीसंत जेव्हा तिहार तुरूंगात बंद होता. त्यावेळी त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. मात्र आता श्रीसंतला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची आशा आहे. त्यासाठी आपण बीसीसीआयशी संपर्क करू, असेही श्रीसंत म्हणाला.श्रीसंत म्हणाला की, मी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकुर यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना म्हटले होते की, बंदी हटवण्यासाठी मी आग्रह करू शकतो. आता ठाकुर यांच्या उत्तराची वाट बघतोय. मला अपेक्षा आहे की, बीसीसीआय अपेक्षेप्रमाणेच निर्णय घेईल. भारताकडून टेस्ट आणि वन डे या दोन्ही प्रकारांत क्रिकेट खेळणारा श्रीसंतने आरोप झाल्यानंतरच्या काळात भोगाव्या लागलेल्या यातनाबाबतही सांगितले. त्यावेळी श्रीसंतला तिहार तुरूंगात ठेवण्यात आले होते. आणि त्याच्यावर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या क्रिकेट सट्टेबाजीच्या रॅकेटशी जोडले जाण्याचे आरोप लावण्यात आले होते.
बंदीची शिक्षा रद्द करा
By admin | Updated: July 29, 2015 02:38 IST