शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
4
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
5
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
6
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
7
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
8
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
9
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
10
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
11
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
12
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
13
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
14
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
15
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
16
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
17
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
18
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
19
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
20
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!

पाणीटंचाईचे गांभीर्य नसल्याने गळती सुरू

By admin | Updated: December 8, 2015 00:28 IST

गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. परंतु, महापालिकेला आणि नागरिकांनासुद्धा पाणीटंचाईचे

दिवाकर गोळपकर,  कोळसेवाडीगेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. परंतु, महापालिकेला आणि नागरिकांनासुद्धा पाणीटंचाईचे गांभीर्य न कळल्याने अनेक ठिकाणी पाणीगळती सुरू असून हजारो लीटर्स पाणी वाहून जात आहे.सध्या मंगळवारी व शनिवारी शासकीय आदेशानुसार पाणीपुरवठा बंद आहे. खरे म्हणजे एकूण चार दिवस लोकांना पाणी मिळत नाही. काही भागात आजही लोकांना पाणी भरपूर मिळत असून काही भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई आहे. महानगरपालिका उल्हास नदीवरील मोहने बंधाऱ्यामधून मोहने उदंचन केंद्राद्वारे १४७ द.ल.ली. प्रतिदिन अशुद्ध पाणी उचलून बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध केले जाते व ते कल्याण (पूर्व) व (पश्चिम) या भागात नागरिकांना वितरीत केले जाते. तसेच उल्हास नदीवरील उदंचन केंद्राद्वारे १०० द.ल.ली. प्रतिदिन अशुद्ध पाणी उचलून नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उचलले जाते व ते डोंबिवली पूर्व व पश्चिम भागात वितरीत केले जाते. पण, कल्याण पूर्व भागात अंदाजे ३.५० लक्ष लोकसंख्येच्या तुलनेने इतर भागांपेक्षा कमी पुरवठा होत असल्याबद्दल पूर्वच्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला अनेक वेळा धारेवर धरले होते. तरीही पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही.कल्याण पूर्वचे पाणीपुरवठा उपअभियंता अशोक घोडे यांना पाणीगळतीसंदर्भात विचारणा केली असता जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमधून ते पाणी वाहत असते. अशा भागातील गळती होत असलेल्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षणानुसार बदली करण्याचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. १५० एमएमच्या २०० मीटर लांबीचे, १०० एमएमच्या १५० मीटर लांबीचे व ८० एमएमच्या २०० मीटर लांबीचे बदलीचे प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याच कामामध्ये रस्त्यावरील व्हॉल्व्हचे चेंबर केले जाणार आहेत. ६२ इमारतींचे कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४० ते ५० विहिरी पडक्या आहेत. अनेक विहिरींची कचराकुंडी झाली आहे. खासगी मालकांच्या ज्या विहिरी आहेत, त्यांचा बंदिस्त करून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापर केला जातो. महापालिकेने पडक्या विहिरींचे सर्वेक्षण करून त्या उपयोगात आणण्यासाठी पुढाकार घेतल्यास पाणीटंचाईवर बऱ्याच अंशी मात करता येईल.कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाईची दखल चाळवासीय गांभीर्याने घेऊन पाणीसाठा करून ठेवतात. परंतु, इमारती आणि इमारतींच्या संकुलांमध्ये काय अवस्था आहे? गाड्या धुण्यापासून बगिच्यांना भरपूर पाणी खर्च होते. सर्वच नागरिकांनी भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन काटकसरीने वापर करायला हवा, असे सोसायटी आणि चाळ कमिटीचे पदाधिकारी यांनी वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जाते. बांधकामे सर्रास सुरू आहेत. त्याचप्रमाणे बेकायदेशीर नळजोडण्या लावण्याचे कामही सुरू आहे. ‘ड’ प्रभाग पाणीपुरवठा विभागातर्फे आशेळे गावातील मुख्य जलवाहिनीवरील नांदिवली व चिंचपाडा गावातील ४० ठिकाणी असलेल्या अनधिकृत जोडण्या ग्रामस्थांच्या मदतीने तोडल्याची माहिती देण्यात आली.