शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

प्रवास एका सायकलपटूचा

By admin | Updated: March 8, 2017 04:43 IST

वय पन्नाशीकडे झुकलेले, उत्साह मात्र विशीतल्या तरुणीसारखा, उन्ह-पावसाची तमा न बाळगता, पर्यावरण संवर्धनासाठी असो, वा ‘बेटी बचाव’ अभियान, पनवेलच्या वंदना भावसार

- पद्मजा जांगडेवय पन्नाशीकडे झुकलेले, उत्साह मात्र विशीतल्या तरुणीसारखा, उन्ह-पावसाची तमा न बाळगता, पर्यावरण संवर्धनासाठी असो, वा ‘बेटी बचाव’ अभियान, पनवेलच्या वंदना भावसार यांची सायकल कायम तयार... मूळच्या मनमाड येथील वंदना यांचे शिक्षण एमकॉमपर्यंत झाले आहे. मुले मोठी झाल्याने घर संसारातून काहीशा मोकळ्या झालेल्या त्यांनी वयाच्या ४२व्या वर्षी, २०१३पासून सायकल चालवण्यास नव्हे, तर सायकलपटू म्हणून नवी ओळख निर्माण केली. गेल्याच महिन्यात १४ फेब्रुवारीला ‘बेटी बचाव’चा नारा देत त्यांनी ‘रण आॅफ कच्छ’चा दौरा सायकलवरून पूर्ण केला. बीच, जंगलसफारी, प्रेक्षणीय स्थळांना तर आपण नेहमीच भेट देतो. मात्र, पांढरी शुभ्र मिठागरे पाहायची असल्यास कच्छशिवाय पर्याय नसल्याचे वंदना सांगतात. मिठाच्या रणातून म्हणजे विस्तीर्ण पठारातून सायकल चालविण्याचे धाडस त्यांनी दाखवले आणि ते यशस्वीरीत्या पूर्णही केले. त्यांच्यासह आणखी ९ जण या मोहिमेत सहभागी होते.सायकलने प्रवास करताना लोकांशी थेट संपर्क येतो आणि या जनसंपर्काचा उपयोग सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी होऊ शकतो, हे लक्षात घेऊन वंदना आणि त्यांच्या टीमने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा संदेश देत गुजरातकडे कूच केली. महाराष्ट्राबरोबरच गुजरातचा सहभागही विकसनशील राज्यात होत असला, तरी कच्छमध्ये अजूनही बालविवाह होतात. त्यामुळे बहुतांश मुली आपले शालांत शिक्षणही पूर्ण करू शकत नाही. या ठिकाणी शैक्षणिक जागृतीची गरज लक्षात घेऊन त्यांच्या चमूने ‘रण आॅफ कच्छ’च्या आपल्या दौऱ्यात ‘बेटी बचाव... बेटी पढाव...’चा नारा दिला होता. आतापर्यंत सायकलवर त्यांनी मोहिमा पार केल्या आहेत. यात गोवा ते कन्याकुमारी हा १२०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी १२ दिवसांत पूर्ण केला आहे. तर गतवर्षी डिसेंबरमध्ये ‘सेव्ह अवर सह्याद्री’ची हाक देत त्यांनी नवापूर ते महाबळेश्वर मोहीम फत्ते केली आहे. याशिवाय महिन्या-दोन महिन्यांतून पनवेल ते खंडाळा, लोणावळा, अलिबाग असा त्यांचा सायकलप्रवास सुरूच असतो. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रित करण्याचा सल्ला अनेकांकडून दिला जातो. मात्र, त्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणारे मात्र थोडेस दिसतात. वंदना यांनी घरातील जबाबदाऱ्यांबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला, इतकेच नव्हे तर त्याला सामाजिक बांधीलकीचीही जोड दिली आहे. - सायकल चालवणारी व्यक्ती पैसा आला की दुचाकी, चारचाकी गाडी घेते. मात्र, त्यानंतर सायकल चालवणे अनेकांना कमीपणाचे वाटू लागते. अशाच व्यक्ती ठरावीक काळानंतर वाढलेले शरीर कमी करण्यासाठी पुन्हा सायकलचा आधार घेताना दिसतात. - वंदना मात्र सायकलस्वारी हा आपला छंद असल्याचे सांगतात. त्यांनी आजवर अनेक सायकलिंगच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले असून अनेकांना मार्गदर्शनही केले आहे. सायकलवर स्वार होऊन भविष्यात मनाली ते ट्रान्स हिमालय अंतर पार करण्याचा त्यांचा मानस आहे.‘रण आॅफ कच्छ’ मोहिमेत अमरापर ते रावेची माता असे १८ कि.मी.चे रण सायकलने क्र ॉस करताना चांगलीच कसरत करावी लागली. जाड मीठ वरवंट्याने वाटताना जसा आवाज व्हावा, तसा खरबरीत आवाज मिठाच्या रणातून जाताना सायकलच्या टायरचा व्हायचा. काही ठिकाणी वरवर मिठाचे पापुद्रे दिसायचे. मात्र, आत टायर फसतात की काय? अशी भीती वाटायची. रण सफरीबरोबरच ढोलवीर, हडप्पाकालीन नागरी संस्कृती असलेल्या नगरात, नरोना गावातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ‘रोगण आर्ट’, लाकडावरील लाख वर्क, लेदर व घंटा कामही या सायकलरूटवर बघता आले. - वंदना भावसार