शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

ठाणे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर ९२४

By admin | Updated: August 3, 2015 03:35 IST

महाराष्ट्रातील मुलींचा उत्तम जन्मदर असणाऱ्या प्रमुख शहरात ठाण्याचा समावेश असून तो दर हजारी ९२४ इतका आहे. या यादीत ठाण्याचे स्थान दहावे आहे.

नामदेव मोरे , नवी मुंबई महाराष्ट्रातील मुलींचा उत्तम जन्मदर असणाऱ्या प्रमुख शहरात ठाण्याचा समावेश असून तो दर हजारी ९२४ इतका आहे. या यादीत ठाण्याचे स्थान दहावे आहे. ही बाब खटकणारी आहे. सर्वाधिक जननदर भंडारा जिल्ह्यात असून तो ९५० इतका आहे. विशेष म्हणजे त्या खालोखाल असलेले जिल्हे हे आदिवासीव्याप्त आणि अविकसित असे आहेत. तर विकसित जिल्ह्यात हा जन्मदर त्यापेक्षा कमी आहे. कमी असलेल्या देशातील १०० जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वात कमी जन्मदर बीडमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई व परिसरातील जनुकीय प्रयोगशाळा व समुपदेशन केंद्राच्या माध्यमातूनही मुलीपेक्षा मुलाला पसंती दिली जात असल्याचे निदर्शनास आले असून या केंद्रांवर बेटी बचाव मोहिमेअंतर्गत लक्ष ठेवण्यात येणार आहे. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून २००४ पासून राज्यात स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी चळवळ सुरू करण्यात आली आहे. लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर व डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर जन्मदर काही प्रमाणात वाढू लागला असला तरी मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील १०० जिल्ह्यांमध्ये राज्यातील दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये बीड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, वाशिम, जळगाव, अहमदनगर, सांगली व कोल्हापूरचा समावेश आहे. सर्वात कमी जन्मदर बीडमध्ये आहे. १९९१ मध्ये एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९३९ होती. २०११ मध्ये ही संख्या ९०७ वर आली आहे. दोन दशकामध्ये तब्बल १३२ अंकांची घसरण झाली आहे. वडवणी, गेवराई, माजलगांव या तिन्ही तालुक्यांमध्ये अनुक्रमे ११३, १११, १०३ अंकांची तीव्र घट झालेली आहे. शिरूर कासार या तालुक्याचे प्रमाण सर्वात कमी ७७९ एवढे आहे. फक्त अंबेजोगाई तालुक्यात मुलींचे प्रमाण ८५० एवढे आहे. बीडनंतर जळगावमध्ये ८४२ एवढे कमी प्रमाण आहे. उर्वरित ८ जिल्ह्यांमधील प्रमाणही ९०० पेक्षा कमी आहे. या दहा जिल्ह्यांमध्ये आता बेटी बचाव, बेटी पढाव मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला केंद्र शासनाकडून १ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. राज्यात सद्यस्थितीमध्ये ५३५ जनुकीय समुपदेशन केंद्र आहेत. फक्त मुंबईमध्येच ५०० पेक्षा जास्त केंद्रे आहेत. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा १९९४ सुधारित २००३ प्रमाणे या प्रयोगशाळांनी ई फॉर्म व समुपदेशन केंद्राने डी फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.