उरण : डी. पी. वर्ल्ड बंदरात बोटीतून कंटेनर काढत असताना अपघात होऊन रविवारी एका कामगाराचा मृत्यू झाला. शिकर मुबारक खान (४६) असे या कामगाराचे नाव आहे. हा कामगार बोटीतील कंटेनर बाहेर काढण्यासाठी असलेल्या क्रेनचे हूक अडकविण्याचे (लॅशिंग) काम करीत होता. रविवारी बोटीतील कंटेनर काढताना हा कामगार दोन कंटेनरमध्ये चेंगरल्याने गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
दोन कंटेनरमध्ये चेंगरून कामगार ठार
By admin | Updated: February 9, 2016 02:28 IST