शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

पाण्याअभावी हाल

By admin | Updated: April 21, 2017 00:26 IST

मागील सहा वर्षांपासून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवा व डावा या दोन्ही तीरांवरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकरी

मिलिंद अष्टिवकर,  रोहामागील सहा वर्षांपासून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवा व डावा या दोन्ही तीरांवरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकरी व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. मागील सहा वर्षांपासून कालव्याला पाणी नसल्याने दुबार शेती इतिहासजमा झाली आहे, तर आता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकंदरीत कालव्याकाठी आमचे गाव, पाण्यासाठी धावाधाव अशीच काहीशी बिकट अवस्था रोहे तालुक्यातील बाहे, सांगडे, उडदवणे, मुठवली, मालसई, धामणसई, गावठण, सोनगाव, वांदोली, मढाली, पिंगळसई तसेच या विभागातील आदिवासीवाडी, ठाकूरवाडी आदी भागातील जनतेची झाली आहे.संतप्त ग्रामस्थांनी प्रांतअधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती व पाटबंधारे विभागातील कार्यालयातील प्रमुखांना १८ एप्रिलला निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले व दोन-तीन दिवसांत कालव्याला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी केली होती. मात्र या घटनेला दोन दिवस झाले तरी अद्याप दखल घेण्यात आली नाही. रोहे तालुक्यातील डोंगर दुर्गम भागातील ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. या ग्रामीण भागात तीन-चार दिवसाआड पिण्यासाठी केवळ ३ ते ४ हंडे पाणी मिळत असल्याने पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी या पाणी समस्येकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रोहा तालुक्यातील सोनगाव येथील सोमेश्वर मंदिर येथे पंचक्रोेशीतील संतप्त ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी बैठक घेऊन विभागातील समस्यांचा पाढा वाचला. या बैठकीत विशेषत: पाण्याचा मुद्दा प्रमुख्याने गाजला. कालव्याला पाणी नसल्याने पंचक्रोशीतील पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामस्थांना फक्त एक ते दोन हंडे एवढेच पाणी मिळत आहे. ग्रामस्थांबरोबर गुरांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी विपुल पशुसंपत्ती व दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना आधार मिळत असे, परंतु पाण्याअभावी हे व्यवसाय बंद झाले आहेत. शेतीत पीक नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गावात गुरांसाठी कुंडलिकेचे पाणी भाड्याच्या टेम्पोने आणावे लागत आहे, तर कपडे धुण्यासाठी महिलांना चार ते पाच कि.मी. पायपीट करून कुंडलिका नदीवर हेलपाटे मारावे लागत आहेत.धामणसई पंचक्रोशीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यान्वित झाली, परंतु कालव्याला पाणी नसल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील सहा वर्षे येथील कालव्याला पाणी येत नसल्याने शेतजमीन ओसाड पडली आहे. त्यातच दुबार पीक इतिहासजमा झाले आहे. दरवर्षी दुबार पीक घेऊन उदरनिर्वाह करणारा शेतकरी आता मात्र शेतजमीन वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहे. त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात जमीन बिल्डरांना विकली आहे. या सुपीक जमिनीवर एकेकाळी पीक घेणारे शेतकरी आता मात्र स्वत:ला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून संघर्ष करीत आहे. अशी भयानक अवस्था येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची झाली आहे. पाण्यासाठी लढा देणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांबद्दल सरकारला सहानुभूतीचा पाझर फुटणार कधी या प्रतीक्षेत हजारो ग्रामस्थ आहेत.