शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

आधी पॅकेज, मगच सर्वेक्षण

By admin | Updated: January 6, 2015 22:14 IST

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी गावासमोरील समुद्रामध्ये जानेवारीपासून १७ दिवसाच्या सर्वेक्षणाला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने आपला जोरदार विरोध दर्शविला आहे.

हितेन नाईक ल्ल पालघरसमुद्रातील तेलसाठ्याचा शोध घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी गावासमोरील समुद्रामध्ये जानेवारीपासून १७ दिवसाच्या सर्वेक्षणाला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने आपला जोरदार विरोध दर्शविला आहे. मासेमारी बंदी कालावधीत होणाऱ्या नुकसानी व पुनर्वसनाबाबत शासनाने प्रथम पॅकेज जाहीर करावे नंतरच सर्वेक्षणाचा निर्णय घ्यावा अशी ठाम भूमिका कृती समितीसह मच्छीमार सहकारी संस्थांनी घेतली आहे.देशाच्या विकासाच्या बाबत घेतलेल्या जनहित कार्यक्रमाला आजपर्यंत मच्छीमारांनी नेहमीच सहकार्य केलेले आहे. मागील काही वर्षापूर्वी ओएनजीसीने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान सातपाटी, मुरबे, डहाणू भागातील मच्छीमारांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु त्याबाबत अजूनही मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे सर्र्वेक्षणामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत भरपाईची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवायला मच्छीमार तयार नाहीत. या सर्र्वेेक्षणाच्या निर्णयाबाबत माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या आदेशाने नेमलेल्या समन्वय समीतीत रामभाऊ पाटील, नरेंद्र पाटील, लिओ कोलॅसो इ. मच्छीमार नेत्यांना समाविष्ट करण्यात आले होते. परंतु आजपासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणाच्या निर्णयाबाबत समन्वय समितीसह कुठल्याही मच्छीमार सहकारी संस्थाना विश्वासात घेतले गेले नसल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजप्रमाणे शासनाने मच्छीमारांसाठी पॅकेजची घोषणा करावी तसेच विरोध असतानाही समुद्रात सर्वेक्षण सुरू केल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसान व जीवीतहानीस शासन जबाबदार असल्याचे पत्र वडराई, केळवा, माहिम, टेंभीच्या मच्छीमार सहकारी संस्थांनी सहा. मत्स्य व्यवसाय आयुक्त, पालघर (ठाणे) यांना दिले आहे. (वार्ताहर)असे होते सर्वेक्षण : ४पालघर तालुक्यातील एडवण, केळवा, माहीम, टेंभी, वडराई या मच्छीमारी गावांपासून ४० ते ५० नॉटीकल मैल सागरी अंतराच्या भागात ओएनजीसी या तेल प्रकल्प कंपनीकडून ६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत समुद्रातील तेल साठ्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान एका महाकाय बोटीच्या पाठीमागे अर्धा ते एक किलोमिटर अंतराच्या तारेला मोठी उपकरणे, फ्लाटस लावलेले असतात. ही बोट सर्वेक्षणासाठी सध्या एडवण ते वडराई दरम्यानच्या मच्छीमारी बोटी ज्या भागात मासेमारी करतात त्या भागामध्ये सर्वेक्षणासाठी फिरणार आहे. अशा वेळी समुद्रातील सर्वेक्षणाच्या इच्छीत स्थळी मच्छीमारांनी मासेमारी करण्यासाठी आपल्या कवी (खुंटे) समुद्रात रोवले आहेत. एक कव मारण्यासाठी सध्या मच्छीमाराला २५ हजार ते १ लाख रू. पर्यंत खर्च येतो. त्याचे काय होणार?४पालघर जिल्ह्णातील वसई तालुका ते पालघर तालुक्यातील मच्छीमारांनी समुद्रात ३ ते ४ हजार कवी मारल्या असून सुमारे १७ दिवस चालणाऱ्या सर्वेक्षणामुळे या कवींचे मोठे नुकसान होणार आहे. तर पारंपारीक दालदा, वागरा, शहेनशहा, मगरी इ. पद्धतीच्या जाळ्याने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची संख्याही मोठी असून समुद्राच्या पृष्ठभागावर टाकलेली जाळी सर्वेक्षण जहाजाच्या तारेच्या दोरखंडामध्ये अडकल्यास मच्छीमाराचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच या महाकाय जहाजाच्या आड एखादी मच्छीमार बोट आल्यास जीवीतहानीची शक्यताही निर्माण होऊ शकते.