शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

मोखाड्यात २५६ आदिवासी बालके मृत्यूच्या दाढेत

By admin | Updated: September 1, 2015 04:27 IST

मुंबईपासून शंभर किमीवर असणाऱ्या मोखाडा तालुक्यात कुपोषणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून ७८ आदिवासी बालके मृत्यूच्या दाढेत आहेत

रवींद्र साळवी , मोखाडामुंबईपासून शंभर किमीवर असणाऱ्या मोखाडा तालुक्यात कुपोषणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून ७८ आदिवासी बालके मृत्यूच्या दाढेत आहेत. शासन दरवर्षी ही समस्या दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र येथील परिस्थिती पाहता ते पाण्यात गेल्यासारखे ठरत आहेत. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत १५ बालकांचा मृत्यू झाल्याने सरकार आहे कुठे, असेच म्हणण्याची पाळी आली आहे.मोखाडा एकात्मिक बाल विकास कार्यालयांतर्गत येणारी १७८ मुले आणि ५१ मिनी अंगणवाड्यांमध्ये ७८ बालके मृत्यूच्या उंबरठ्यावर असून ६५८ बालके कुपोषणाच्या विळख्यात असल्याची धक्कादायक माहिती लोकमतच्या हाती आली आहे. तसेच हे विदारक चित्र आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघातील आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला गेल्या ३ वर्षांपासून स्वतंत्र अधिकारी नाही, तर एकूण १७८ पैकी ५२ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती नाहीत. यातील १५७ अंगणवाड्यांना पेयजलाची सुविधा नाही. यामुळे कुपोषण रोखण्यासाठीचा कोट्यवधींचा निधी जातो तरी कुठे, असा सवाल विचारला जात आहे.अंगणवाड्यांमध्ये बालकांचा आहार, स्वच्छता, पेयजल सुविधा, शौचालय आदी बाबी एकात्मिक बालविकास कार्यालयाशी निगडित आहेत. परंतु, हे विभाग मात्र कुपोषण निर्मूलनात अपयशी ठरत असून आदिवासी विभाग, आरोग्य विभाग ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगून हा प्रश्न टोलवत आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांचा पगारदेखील वेळेवर होत नाही. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला स्वतंत्र अधिकारी नसल्याने किरकोळ कामासाठी पालघरशी संपर्क साधावा लागतो. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ, डॉक्टरांचा अभाव आहे. ही स्थिती बदलणार तरी कधी? (वार्ताहर)