शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतची पाणीयोजना मोजतेय अखेरची घटका

By admin | Updated: March 26, 2017 05:13 IST

शंभर टक्के सरकारी अनुदानातून १९९५मध्ये मंजूर झालेली कर्जत वाढीव पाणीयोजना आता नगरपालिकेच्या नियोजनाअभावी

कांता हाबळे / नेरळशंभर टक्के सरकारी अनुदानातून १९९५मध्ये मंजूर झालेली कर्जत वाढीव पाणीयोजना आता नगरपालिकेच्या नियोजनाअभावी तोट्यात चालली आहे. ही पाणीयोजना बंद पडल्यास कर्जतकरांचे पाण्यावाचून हाल होतील, यात शंका नाही. ही पाणीयोजना सुरळीत आणि कमी खर्चात कशी चालू ठेवता येईल, यासाठी पाणी सभापती लालधारी पाल, गटनेते राजेश लाड, शिवसेनेचे नगरसेवक संतोष पाटील, सोमनाथ ठोंबरे, मिलिंद चिखलकर आणि अभियंता गजभिये यांनी पाणीयोजनेची पाहणी करून उपाययोजनांवर चर्चा केली. कर्जत शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ८० हजार नागरिकांना पुरेल, अशी पाणीयोजना १९९५मध्ये तत्कालीन शिवसेनेचे आमदार देवेंद्र साटम यांनी मंजूर करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पूर्ण करून घेतली आणि कर्जतकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. पेज नदीला १२ महिने पाणी असल्याचा फायदा घेत नदीवर ही योजना सुरू करण्यात आली. पंपिंग स्टेशन आणि विहीर करून साधारण २० कि.मी. जलवाहिनीद्वारे कर्जत-दहिवली येथे बांधण्यात आलेल्या शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी आणून पुढे दहिवली, गुंडगे आणि कचेरीवर मोठ्या टाक्या बांधून पूर्ण कर्जत शहराला पाणीपुरवठा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २००४मध्ये ही योजना कर्जत नगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर योजना सुरू ठेवण्यासाठी कर्जत नगरपालिकेला खर्चाची कसरत करावी लागत आहे. या योजनेसाठी पंपिंग स्टेशनवर ८० एच.पी.च्या तीन मशिन बसवल्या आहेत. मात्र, मशिनची पात्रता कमी असल्यामुळे २४ तासांतील २० तास पाणीउपसा करण्यासाठी या मशिन चालू ठेवल्या जात आहेत. तसेच शुद्धीकरण प्रकल्पावर १२० एच.पी.च्या दोन मशिन बसवल्या असून, त्याही साधारण २० तास चालू ठेवल्या जाव्या लागत आहेत. रोज साधारण ४ एमएलडी, म्हणजे चाळीस लाख लिटर पाणीउपसा करावा लागत आहे; परंतु मशिनची क्षमता कमी असल्यामुळे त्या जास्त वेळ सुरू राहत असल्याने वीजबिल भरपूर येत आहे. वर्षाला ८० लाख रु पये वीजबिल हे पाणीयोजनेचे येत आहे. तसेच हे पंप आणि जलवाहिनी जुनी झाल्यामुळे त्याचा देखभालीचा खर्च वाढत आहे. देखभालीसाठी साधारण ६० लाख रुपये खर्च नगरपालिका वर्षाला करते. जास्त हॉर्सपॉवरच्या मशिन न घेतल्याने खर्च वाढत असल्याची चर्चा आहे. ६५ लाखांचा तोटा नगरपालिकेने शहरात एकूण ५२५० नळजोडण्या दिल्या आहेत. प्रत्येकी १५०० याप्रमाणे साधारण ६० लाख रु पये पाणीपट्टीद्वारे जमा होत आहेत; पण वीजबिल आणि देखभाल खर्च हा साधारण सव्वा कोटींपर्यंत आहे. म्हणजे साधारण, ६५ लाख रु पये तोट्यात पाणीयोजना चालू आहे. असून काही दिवस असे सुरू राहिल्यास नियोजनाअभावी पाणीयोजना बंद पडू शकते.