शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे ‘नैना’ क्षेत्राच्या विकासाचे नियोजन कोलमडणार

By admin | Updated: July 27, 2016 03:23 IST

नैना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू आहे. या अतिक्रमणांना वेळीच आळा घातला गेला नाही तर नैनाच्या विकासाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील बेकायदा

- कमलाकर कांबळे, नवी मुंबई

नैना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू आहे. या अतिक्रमणांना वेळीच आळा घातला गेला नाही तर नैनाच्या विकासाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांना प्रतिबंध घालण्यात सिडकोच्या संबंधित यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरल्या आहेत. ही बाब नियोजनाला मारक ठरण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २७० गावांतील सुमारे ६०० चौरस किलोमीटर क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार सिडकोने नैना प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून नैना प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना सिडकोने आखली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा प्रारूप विकास आराखडा तयार करून नागरिकांच्या सूचना व हरकतींवर सुनावणी घेवून तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेला तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लागल्याने या क्षेत्रात विनापरवाना बांधकामांचे पेव फुटले आहेत. या बांधकामांना वेळीच आवर घातला नाही तर नैनाच्या विकासाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांना प्रतिबंध घालण्याची गरज जाणकारांनी व्यक्त केली आहे.नैनाचे क्षेत्र विस्तीर्ण असल्याने या परिसरातील बेकायदा बांधकामांवर लक्ष ठेवणे सिडकोच्या दृष्टीने जिकिरीचे होवून बसले आहे. यातच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, इतर साधनसामग्रीचा अभाव आदी बाबी भूमाफियांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून या क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. ही बाब नैनाच्या विकासाला मोठा अडथळा ठरणार आहे. कारण नैनाच्या विकास प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरूवात झाल्यानंतर या अनधिकृत बांधकामांविषयी नवीन धोरण तयार करण्याची कसरत सिडकोला करावी लागणार आहे. अतिक्रमण विभागाचा अर्थपूर्ण कारभारसिडकोच्या अतिक्रमण विभागामार्फत नैना क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. या विभागाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात या क्षेत्रात सुरू असलेल्या जवळपास ३00 बांधकामांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच बांधकामांवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित बांधकामांना संबंधित विभागाकडून अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याचे एकूण चित्र आहे.गरजेपोटीच्या घरांची पुनरावृत्तीसिडको आणि महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे येथील मूळ गावे बकाल झाली आहेत. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. या बांधकामांना वेळीच प्रतिबंध न घातला गेल्याने पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. विकास खुंटलेल्या गाव-गावठाणांना पुन्हा विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचे मोठे आव्हान संबंधित प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. ही बाब लक्षात घेवून सिडकोच्या नैना प्राधिकरणाने आपल्या क्षेत्रातील अतिक्रमणे रोखण्यासाठी वेळीच कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.