शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

जिल्ह्यात पर्यटनस्थळांसाठी कोट्यवधींचा निधी

By admin | Updated: March 26, 2017 05:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त यंदाचे वर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत

जयंत धुळप /अलिबागडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त यंदाचे वर्ष ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत ३०.२१ कोटी रुपये खर्च करून राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची २८ ठिकाणे व स्थळांचा विकास करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाकरिता प्रसिद्ध चरी गावासह महाड चवदार तळे आणि महाड क्रांतिस्तंभ या तीन ऐतिहासिक स्थळांचा समावेश असून, त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.जगाच्या पाठीवर १९३२ ते १९३९ अशी तब्बल सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे अलिबाग तालुक्यातील चरी-कोपर येथील शेतकरी संप आहे. तत्कालीन सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील २५ गावांतील शेतकऱ्यांनी संघटित होऊन हा संप केला होता. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले होते. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी येथे येऊन पाठिंबा दिला होता. याच शेतकरी संपामुळे ‘कूळ कायदा’ जन्मास आला, तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘कसेल त्याची जमीन’ नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रस्थापित झाले. खोत, सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून येथीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील शेतकरी मुक्त झाला. या ऐतिहासिक शेतकरी संपाच्या अमृतमहोत्सव वर्षी २५ जानेवारी २००९ रोजी चरी येथे एक अनोखे स्मारक उभारण्यात आले. लोखंडी कुदळ (टिकाव) या शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या अवजारापासून झेप घेणाऱ्या गरूड पक्षाच्या आकाराचे अनोखे स्मारक उंबर्डे (पेण) येथील गतवर्षीचा ‘लोकमत-महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार प्राप्त शिल्पकार किशोर ठाकूर या कल्पकतेतून साकारले आहे. आता शासनाने जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या स्मारक विकास अनुदानातून येथे ग्रथालय, वाचनालय आणि सभागृह बांधण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून या शेतकरी संपाच्या स्मृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा संप१९३२ ते १९३९ अशी तब्बल सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे अलिबाग तालुक्यातील चरी-कोपर येथील शेतकरी संप आहे. तत्कालीन सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील २५ गावांतील शेतकऱ्यांनी संघटित होऊन हा संप केला होता. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले होते. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी येथे येऊन पाठिंबा दिला होता. शेतकरी संपामुळे ‘कूळ कायदा’ जन्मास आला, तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘कसेल त्याची जमीन’ नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रस्थापित झाले. खोत,सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून येथीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील शेतकरी मुक्त झाला. या ऐतिहासिक शेतकरी संपाच्या अमृतमहोत्सव वर्षी २५ जानेवारी २००९ रोजी चरी येथे एक अनोखे स्मारक उभारण्यात आले. महाड चवदार तळे परिसर सुशोभिकरण आणि सभागृह नूतनीकरणच्२५ डिसेंबर १९२७ रोजीच्या महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या स्मृती चिरंतन राहून येणाऱ्या नव्या पिढीला त्यांतून स्फूर्ती प्राप्त व्हावी, या हेतूने महाड चवदार तळे परिसर सुशोभिकरण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्याकरिता एक कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला आहे. त्याचबरोबर महाडमधीलच क्रांतिभूमी येथील शाहू महाराज सभागृहाचे नूतनीकरण करण्याकरिताही एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.