शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

जेएनपीटी परिसराला रक्तचंदन माफियांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 02:17 IST

जेएनपीटी परिसरात मागील काही वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

- मधुकर ठाकूर उरण : जेएनपीटी परिसरात मागील काही वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मागील काही वर्षांमध्ये ५ हजार टनपेक्षा जास्त रक्तचंदन जप्त करून ६० पेक्षा जास्त आरोपींना गजाआड करण्यात आहे. कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातून रक्तचंदन जेएनपीटीमध्ये आणले जात असून येथून ते विदेशात पाठविले जात असून ही तस्करी पूर्णपणे थांबविण्याचे आव्हान शासकीय यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.उरण परिसरातील वैष्णो लॉजिस्टिक कंटेनर यार्डवर डीआरआय विभागाने ४ सप्टेंबरला धाड टाकली होती. या धाडीत एका कंटेनरमधून साडेचार कोटी किमतीचे सुमारे १० टन रक्तचंदन पकडण्यात आले. अधिकृत सूत्रांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कस्टम, पोलीस, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील काही वर्षात विविध ठिकाणी आणि उरण परिसरात अनेक कंटेनर गोदामांवर धाडी टाकून सुमारे पाच हजार टनापेक्षा अधिक रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या या रक्तचंदनाची किंमत आंतरराष्टÑीय बाजारपेठेत अब्जावधी रुपये आहे. या प्रकरणी विविध प्रकरणात सुमारे ६० आरोपींना अटक करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले असले तरी मुख्य सूत्रधारांपर्यंत अद्याप पोहचता आलेले नाही. सहा-सात वर्षांपासून चंदन तस्करीचे प्रमाण वाढले आहे. परदेशात प्रामुख्याने चीन, मलेशिया, जपान, सिंगापूर आणि आशिया खंडातून भारतातील रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. भारतात कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातील जंगलात रक्तचंदनाची लागवड केली जाते. परदेशात दर्जानुसार १२० ते २०० डॉलर प्रति किलोच्या भावाने रक्तचंदन विकले जाते. परदेशात मिळणाºया प्रचंड भावामुळे आंतरराष्टÑीय माफियांनी रक्तचंदनाच्या तस्करीकडे आपला मोर्चा वळवला आहे.सीमा शुल्क, डीआरआय विभागातील काही अधिकाºयांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मागील काही वर्षांत जेएनपीटी परिसरातील कंटेनर गोदामे अणि इतर काही ठिकाणाहून कस्टम, डीआरआय, वनविभाग आणि पोलिसांनी टाकलेल्या विविध धाडीतून अब्जावधी रुपयांचा साठा जप्त केला आहे. आंतरराष्टÑीय माफियांमध्येच रक्तचंदन तस्करीच्या टोळ्या वाढल्या असून एक टोळी दुसºयांची माहिती पोलीस व इतर यंत्रणांना देऊ लागली आहे. प्रतिस्पर्धी टोळ्यांतील खबरेच आता दुश्मन तस्कर टोळ्यांच्या तस्करीची माहिती संबंधित सुरक्षा विभागाला देऊ लागल्याने मागील सहा-सात वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्याची क बुलीही संबंधित सुरक्षा विभागाच्या एका अधिकाºयाने दिली.रक्तचंदनाची तस्करी पूर्णपणे थांबविण्यासाठी या टोळ्यांचे म्होरके सापडणे आवश्यक असून ते शोधण्याचे आव्हान पोलीस,सीमा शुल्क व इतर सर्व विभागांसमोर आहे.रक्तचंदन तस्करीच्या महत्त्वाच्या घटनामार्च २०१५ - मुंबई-गोवा महामार्गावर कल्हे गावाजवळ कंटेनरमध्ये ४१ लाख ६० हजार रुपये किमतीचे रक्तचंदन जप्त. पाच आरोपींना अटकमार्च २०१८ - महसूल विभागाने मक्याच्या कणसाच्या पिशव्यांमधून २ कोटी ८५ लाख रुपयांच्या चंदनाची तस्करी करणाºया चौघांना अटक केली. दुबईला रक्तचंदन पाठविणार असल्याचे तपासात उघड झाले होते.आॅगस्ट २०१३ - उरण रोडवर दोन कंटेनरवर छापा टाकून साडेआठ कोटी रुपये किमतीचे ४२ टन रक्तचंदन जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक केली होती.जानेवारी २०११ - जेएनपीटीजवळ सीमा शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून २ कोटी ९ लाख रुपये किमतीचे रक्तचंदन जप्त केले.