नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये कारला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सोमवारी पामबीच रोडवर वाशी पुलाखाली आग लागून महेंद्रा झायलो कार जळून खाक झाली. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.नेरूळकडून वाशीकडे येणाºया कारमधून अचानक धूर येऊ लागला होता. चालकाने प्रसंगावधान राखून कार रोडच्या बाजूला उभी केली. कारने अचानक पेट घेतला. याविषयी अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत कार पूर्णपणे खाक झाली होती. नवी मुंबई परिसरामध्ये कारला आग लावण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. प्रत्येक महिन्याला एक ते दोन घटना घडू लागल्या आहेत. वास्तविक रिक्षासह इतर वाहनांमध्ये आग विझविण्यासाठी फायर इस्टिंगविशर असणे आवश्यक आहे, परंतु बहुतांश चालक काहीही तरतूद करत नाहीत. यामुळे आग लागल्यास ती तत्काळ विझविता येत नाही. वाशीमध्ये झालेल्या घटनेमध्येही मदतीसाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचेपर्यंत कारचे पूर्णपणे नुकसान झाले होते.
पामबीच रोडवर कार जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:40 IST