शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

जैवविविधता केंद्र पर्यटकांचे आकर्षण

By admin | Updated: May 25, 2017 00:33 IST

वनविभागाने ऐरोलीमध्ये सुरू केलेले किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वनविभागाने ऐरोलीमध्ये सुरू केलेले किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले आहे. खाडी किनाऱ्यांचे महत्त्व, जैवविविधतेची माहिती व किनाऱ्यांचे संरक्षण कसे करावे याविषयी माहितीचा खजाना या केंद्रामध्ये असल्याने उन्हाळ्याच्या सुटीमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी पर्वणीच ठरली आहे. ठाणे ही आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी आहे. २६ किलोमीटरच्या खाडी परिसरामध्ये २०० पेक्षा जास्त पक्षी, सागरी जैवविविधता, खारफुटीचे घनदाट जंगल आहे. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडी किनाऱ्यावर प्रत्येक वर्षी आश्रयाला येतात. या जैवविविधतेची माहिती नागरिकांना व्हावी व खाडीचे पर्यटनस्थळामध्ये रूपांतर व्हावे यासाठी वनविभागाने ऐरोलीमध्ये दिवाळे जेट्टीच्या परिसरामध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात खाडी परिसरामध्ये असलेल्या खारफुटीचे जंगल, त्यांच्या विविध जातीची माहिती दिली आहे. मासे, खेकडे, गोगलगायी, फ्लेमिंगो या पक्ष्यांची माहिती देण्यात आली आहे. खारफुटीचे व जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काय करावे याविषयी माहिती देण्यात आली आहे. बेडूक, मासे व इतर पक्ष्यांचे आवाज येथे ऐकण्यास मिळत आहेत. खारफुटीमध्ये असलेले साप, पक्षी व इतर जीवजंतूहीही पहावयास मिळत आहेत. निसर्ग परिचय केंद्रामध्ये सेल्फी पॉइंट विकसित केला आहे. यामध्ये फ्लेमिंगो, कासवांची प्रतिकृती ठेवली असून ते पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. केंद्राच्या बाहेर खारफुटी निरीक्षणासाठी बांबूचा वापर करून मार्ग बनविण्यात आला आहे. परंतु हा मार्ग धोकादायक असल्याने सद्यस्थितीमध्ये तो बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी फायबरचा मार्ग बनविण्यात येणार आहे. खारफुटी, खेकड्यांचे तळे, निसर्गभ्रमण पायवाट, खाडी निरीक्षणाची सोय करण्यात आली आहे. खारफुटीचे निरीक्षण करण्याचा आनंदही घेता येत आहे. नवी मुंबईमध्ये वंडर्स पार्क हे एकमेव विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाणी आहे. या व्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी जावे असे एकही ठिकाण नव्हते. वनविभागाने तयार केलेल्या या केंद्रामुळे नागरिकांसाठी हक्काचे निसर्ग पर्यटनस्थळ उपलब्ध झाले असून उन्हाळ्याची सुटी असल्याने शेकडो नागरिक या केंद्राला भेट देत आहेत.प्रदुषण रोखण्याचे आवाहन निसर्ग परिचय केंद्रामध्ये खाडी किनाऱ्यामध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी, खारफुटीची कत्तल, प्लास्टीक व इतर रसायनमिश्रीत पाण्यामुळे होणारे प्रदुषण याविषयी माहितीपट दाखविण्यात येत आहे. खाडीचे रक्षण करणे का आवश्यक आहे. खारफुटी संरक्षण भिंतीचे काम कसे करत आहे याविषयी माहितीही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्पा पूर्ण करण्याची मागणी निसर्ग परिचय केंद्राच्या पहिल्या टप्प्यात माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. जवळपास १५ एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जात असून त्याचा दुसरा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नौकाविहाराची सुविधा असणार आहे. खाडीमध्ये जावून जलपर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. धोकादायक बांबूच्या पुलाच्या जागी खारफुटी निरीक्षणासाठी फायबरचा मार्ग झुलता पूल तयार केला जाणार आहे. केंद्राच्या बाजूच्या भूखंडावर उद्यान विकसित केले जाणार आहे.

जैवविविधता केंद्रामध्ये उपलब्ध माहिती महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांची लांबी व महत्त्व खाडीमधील जैवविविधतेची तपशीलासह माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असलेल्या चिखल्या खेकड्याची माहितीखाडी किनारी असलेले पक्षी व त्यांची माहितीठाणे खाडीमध्ये येणारे फ्लेमिंगो व इतर विदेशी पक्षांची माहितीस्थलांतरित पक्षी, त्यांच्या स्थलांतराची कारणे व इतर माहिती पक्ष्यांच्या विसाव्याच्या जागेची माहिती, पक्ष्यांसाठी उपलब्ध खाद्यसेल्फी पाइंटमध्ये फ्लेमिंगो, कासवाची प्रतिकृतीद्रृकश्राव्य विभागामध्ये खाडीकिनाऱ्याची व पक्ष्यांचा माहिती पट