शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तांचे होणार सर्वेक्षण

By admin | Updated: July 5, 2016 02:53 IST

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. परंतु २५ वर्षांमध्ये शहरातील सर्व मालमत्तांचे सविस्तर सर्वेक्षणच झालेले नसल्याने पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे.

- नामदेव मोरे, नवी मुंबई

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. परंतु २५ वर्षांमध्ये शहरातील सर्व मालमत्तांचे सविस्तर सर्वेक्षणच झालेले नसल्याने पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे भविष्यात अत्याधुनिक जीआयएस तंत्राचा वापर करून सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याविषयी प्रशासकीय स्तरावर चाचपणी सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन महिन्यामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करतानाच पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याकडे लक्ष दिले आहे. प्रमुख स्रोत असणाऱ्या एलबीटी व मालमत्ता करांसह सर्व विभागांच्या उत्पन्नाचा नियमित आढावा घेतला जात आहे. प्रशासनातील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होवू लागली आहे. २०१५ मध्ये एप्रिल ते जूनपर्यंत ८० कोटी रूपये कर वसूल झाला होता. यावर्षी ही रक्कम १२६ कोटी रूपये झाली होती. २३ जूनपर्यंत गतवर्षी ९१ कोटी व यावर्षी १३९ कोटी रूपये वसूल झाले होते. ३० जूनपर्यंत हाच आकडा गतवर्षी १०० कोटी व यावर्षी १६४ कोटी रूपये झाला आहे. कर वसुलीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केल्यामुळे हा फरक दिसू लागला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून मालमत्ता कर विभागाकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे येथील कारभारामध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. मालमत्ता कर विभागाने एकदाही शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण केलेले नाही. यामुळे अनेक मालमत्तांना कर लागलेला नाही. कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे, नेरूळमध्ये अनेक बैठ्या चाळीच्या जागेवर तीन ते पाच मजली बांधकाम झाले आहे. रोडच्या बाजूला असणाऱ्या निवासी मालमत्तांचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. यामुळे त्यांच्या करआकारणीमध्ये बदल होणे आवश्यक आहे. मालमत्ता कर विभागाकडील आकडे संभ्रमात टाकत आहेत. दोन महिन्यापूर्वी माहिती घेतली असताना शहरात ३ लाख ८ हजार ७८ मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सविस्तर माहिती घेतली असताना तो आकडा ३ लाख ७ हजार दाखविण्यात आला. परंतु यामधील फक्त २ लाख ९२ हजार मालमत्तांना बिले पाठविली होती. हा गोंधळ थांबविण्यासाठी व शहरातील सर्वच मालमत्ता कराच्या कक्षेत येण्यासाठी सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. मालमत्ता सर्वेक्षण करण्यासाठी जीआयएस तंत्राचा वापर केला जाणार आहे. यामुळे प्रत्येक मालमत्तांची सविस्तर माहिती प्राप्त होवू शकणार आहे. याशिवाय करआकारणी करणेही सुलभ होवू शकते. मालमत्ता कर विभागाच्या कामकाजातील त्रुटी दूर झाल्या की सर्वेक्षणाविषयी प्रस्ताव तयार केला जाण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. मालमत्तांच्या आकड्यांचा घोळ; सर्वेक्षण होणे आवश्यकमहापालिका प्रशासनाने गतवर्षी आर्थिक स्थिती अहवाल सादर करताना शहरात २ लाख ९४ हजार ६१९ मालमत्ता असल्याचे स्पष्ट केले होते. यामध्ये २,४०,३३९ निवासी, ४८,९०६ वाणिज्य व ५३८४ औद्योगिक मालमत्ता असल्याचे सांगितले होते. परंतु प्रकाश कुलकर्णी यांच्या निलंबनानंतर प्रशासनाकडे माहिती विचारली असता त्यांनी ३ लाख ८ हजार ७८ मालमत्ता असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात विभागवार माहिती घेतल्यानंतर तो आकडा ३ लाख ७ हजार रूपये झाला व प्रत्यक्षात बिले २ लाख ९२ हजार मालमत्तांना देण्यात आली. मालमत्तांच्या आकड्यांचा हा घोळ कमी करण्यासाठी मालमत्तांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीचा मुंढे पॅटर्न महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना २०१५ मध्ये १४६ कोटी रूपयांचे करवसुलीचे उद्दिष्ट दिले होते. वर्षभर नियोनबद्ध कामकाज करून त्यांनी प्रत्यक्षात २२९ कोटी रूपये महसूल संकलित केला होता. नवी मुंबईमध्ये आल्यानंतरही त्यांनी करवसुली व कामकाजामध्ये सुधारणा करण्याचा सपाटा लावला आहे. गतवर्षी ३० जूनपर्यंत मालमत्ता करापोटी १०० कोटी रूपये वसूल झाले होते. मुंढे यांनी दोन महिन्यात करवसुलीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे यावर्षी १६४ कोटी रूपये वसूल झाले आहेत.