शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये ३२४ जातींचे पक्षी

By admin | Updated: November 14, 2015 23:48 IST

इंडीयन बर्डमॅन म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सलीम अली यांचे वास्तव्य अलिबाग तालुक्यातील किहिम येथे होते. तेथेच त्यांनी पक्षी निरिक्षण, अभ्यास आणि त्यांच्या नोंदी केल्या.

जयंत धुळप, अलिबागइंडीयन बर्डमॅन म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सलीम अली यांचे वास्तव्य अलिबाग तालुक्यातील किहिम येथे होते. तेथेच त्यांनी पक्षी निरिक्षण, अभ्यास आणि त्यांच्या नोंदी केल्या. पुढे त्यांच्या पक्षी अभ्यासाची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेली. सद्यस्थितीत अलिबाग तालुक्यांत पक्षांच्या विविध जातींची संख्या ही इंग्लंडमधील पक्षी जातींपेक्षा अधिक असल्याचे पक्षी नोंदणीअंती निष्पन्न झाले आहे. इंग्लंडमध्ये विविध पक्ष्यांच्या ३०० जाती नोंदीत आहेत तर केवळ अलिबाग तालुक्यांत हीच संख्या ३२४ इतकी असल्याची माहिती ज्येष्ठ पक्षीमित्र, अभ्यासक डॉ. वैभव देशमुख यांनी दिली आहे.आता दरवर्षी होणार पक्षी गणनाभारतातील पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंती निमित्त रविवार १५ नोव्हेंबर रोजी देशव्यापी ‘डॉ.सलीम अली पक्षी गणना’ करण्याची घोषणा बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने केली आहे. आता दरवर्षी १२ नोव्हेंबर या डॉ. अली यांच्या जन्मदिनास लागून येणाऱ्या रविवारी ही पक्षी गणना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष्यांची छायाचित्रांसह नोंदत्यांनी अलिबाग तालुक्यांतील या ३२४ जातींच्या पक्षांची छायाचित्रे घेवून त्यांची नोंद जागतिक स्तरावरील पक्षी नोंदणी करणाऱ्या विविध वेबसाईट्सवर केली आहे. त्यांनी केवळ पक्षाची छायाचित्रे घेतली नाहीत तर छायाचित्र घेतल्यावर त्या पक्षाची संपूर्ण माहिती संकलीत करण्याचे काम केले आहे. हा पक्षी मुळचा कोठला आहे, तो परदेशातून येवून येथे राहीला आहे का, त्याचे वास्तव्य नेमके कोठे आहे, त्याच्या खाण्याच्या वावरण्याच्या सवयी कोणत्या आहेत अशी सारी माहिती नोंदविली आहे, हा देखील एक विक्रमच म्हटला पाहिजे.बर्ड काउंट इंडिया या संस्थेच्या सहभागातून पक्षी गणनारविवारी बर्ड काऊंट इंडीया या संस्थेच्या सहभागातून ‘डॉ.सालीम अली पक्षी गणना’देशभर करण्यात येणार आहे. यामध्ये देखील देशमुख सहभागी होणार असून, ते अलिबाग तालुक्यांतील रामधरणेश्वर परिसरात पक्षी निरिक्षण व गणना करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे संकलन व विश्लेषण संपूर्ण एक दिवसाचा हा उपक्र म असून त्यात देशभरातील पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी त्यांच्या जवळच्या ठिकाणी पक्षी निरीक्षण करणार आहेत. त्यांच्या निरिक्षणाच्या नोंदी ते www.ebird.org या संकेतस्थळावर कराणार आहेत. या नोंदींमधून प्राप्त माहितीचे बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे संकलन करून त्यांचे विश्लेषण केले जाणार आहे.