ऑनलाइन टीमकौरी (हिमाचल प्रदेश), दि. ११ - जगातील सर्वात उंच पूल बांधण्याचा विक्रम भारतीय रेल्वेच्या नावावर जमा होणार असून या पुलाची उंची आयफेल टॉवर पेक्षाही जास्त असणार आहे. बारामुल्ला ते जम्मू या भागाला जोडण्यासाठी चिनाब या नदीवर हा पुल बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी कोकण रेल्वेकडे देण्यात आली आहे.हिमालय पर्वतरांगांमध्ये चिनाब नदीवर ३५९ मीटर म्हणजेच १, ७०० फूट उंच पुल बांधण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. पुल धनुष्याकृती असून तो बारामुल्ला ते जम्मु पर्यंत जोडण्यात येणार असल्याचे पुलाचे बांधकाम करणा-या अभियंत्यांनी सांगितले. जम्मु ते बारामुल्ला हे अंतर कापायला साधारण सहा तास लागतात. या पुलामुळे हे अंतर निम्म्या वेळेत कापता येणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होईल असे रेल्वेच्या अधिका-यांनी स्पष्ट केले. भारतात बांधण्यात येणारा हा पुल जोरातवाहणारे वारे आणि इतर नैसर्गीक बाबी लक्षात घेऊन बांधण्यात येत आहे. सध्या जगातील सर्वात उंच पुल हा चीनच्या ग्वीझआऊ प्रदेशातील बिपांजेंग नदीवर आहे
भारतीय रेल्वे बांधणार जगातील सर्वात उंच पुल
By admin | Updated: July 11, 2014 17:18 IST