शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

२0२५ पर्यंत पाण्यासाठी हाहाकार माजणार

By admin | Updated: April 29, 2016 04:59 IST

पाण्याच्या मागणीचा वाढता वेग आणि मर्यादित उपलब्धता लक्षात घेता इ.स.२०२५ पर्यंत लोकांना १३.५ टक्के कमी पाणी मिळेल.

नितीन अग्रवाल,

नवी दिल्ली-पाण्याच्या मागणीचा वाढता वेग आणि मर्यादित उपलब्धता लक्षात घेता इ.स.२०२५ पर्यंत लोकांना १३.५ टक्के कमी पाणी मिळेल. केंद्र सरकारने वाढती लोकसंख्या, उद्योग, शहरीकरण आणि बदलत्या जीवनशैलीला यासाठी जबाबदार ठरविले आहे. दरम्यान सरकारने दुष्काळग्रस्त १० राज्यांना १२,८२७ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिल्याचा दावा केला पण पाण्याच्या राज्यवार स्थितीची माहिती मात्र नाही.जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण राज्यमंत्री संवारलाल जट यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, २०११ मध्ये दरडोई १५४५ घनमीटर पाणी उपलब्ध होते. पण २०२५ पर्यत हे प्रमाण १३४० घनमीटरवर पोहोचेल. आधीच मर्यादित पाणी असताना वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरणाने त्यात आणखी घट होत आहे. प्रति व्यक्ती १७०० घनमीटरपेक्षा कमी पाणी असल्यास पाण्याची समस्या आणि १००० घनमीटरला तुटवडा मानला जातो. >महाराष्ट्रातील ३७ सिंचन योजना पूर्ण, २० रखडल्याजलसंसाधन राज्यमंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, राज्याच्या रायगड जिल्ह्यातील बाणगंगा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मदत मागण्यात आलेली नाही.याशिवाय महाराष्ट्रात १९९६-९७ पासून सुरू असलेल्या ६६ सिंचन प्रकल्पांपैकी केवळ ३७ प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. यासाठी केंद्राने १०३६३.८ कोटी रुपयांची आर्थिक मदत कर्जाच्या रूपात केली आहे. सरकारच्या सिंचन प्रकल्पावरील खर्चात झालेल्या वारेमाप वाढीकडे लक्ष वेधले असता जट म्हणाले की, इ.स. २०१२ मध्ये राज्य सरकारने डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती.या समितीने प्रकल्प खर्चात असामान्य वाढीला दरवाढ, वाढते भूसंपादन, पुनर्वसन खर्चातील वाढ आणि कार्यक्षेत्रातील बदल कारणीभूत असल्याचे सांगितले होते. समितीच्या अहवालावर राज्य सरकारकडून कारवाई व्हायची आहे.