वाडे-कुर्डी सरकारी माध्यमिक विद्यालय अजिंक्य
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
सांगे : तालुका पातळीवर आयोजित सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सरकारी माध्यमिक विद्यालय, वाडे-कुर्डी, सांगेने 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अजिंक्यपद पटकावले. या सामन्यात त्यांनी काले सरकारी हायस्कूलचा टायब्रेकरमध्ये 3-2 गोलनी पराभव केला. विजयी संघात प्लेसिटो डिकॉस्ता, सतीश भाटीकर, उत्कर्ष वाशेलकर, ईश्वर भंडारी, निशांत गावकर, जॅरीको डिकॉस्ता, बाळू मिशाळ, मंगेश गावकर, सागर वेळीप, मोहीत गावकर, समेश गावकर, मार्वल फर्नांडिस, मंथन गावकर, भानुदास गावकर, बोबो झोरो यांचा समावेश होता.
वाडे-कुर्डी सरकारी माध्यमिक विद्यालय अजिंक्य
सांगे : तालुका पातळीवर आयोजित सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सरकारी माध्यमिक विद्यालय, वाडे-कुर्डी, सांगेने 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अजिंक्यपद पटकावले. या सामन्यात त्यांनी काले सरकारी हायस्कूलचा टायब्रेकरमध्ये 3-2 गोलनी पराभव केला. विजयी संघात प्लेसिटो डिकॉस्ता, सतीश भाटीकर, उत्कर्ष वाशेलकर, ईश्वर भंडारी, निशांत गावकर, जॅरीको डिकॉस्ता, बाळू मिशाळ, मंगेश गावकर, सागर वेळीप, मोहीत गावकर, समेश गावकर, मार्वल फर्नांडिस, मंथन गावकर, भानुदास गावकर, बोबो झोरो यांचा समावेश होता.या विद्यालयातील मुलींनी 17 वर्षांखालील मुलींच्या गटात दुसरे स्थान पटकावले आणि 14 वर्षाच्या मुलांच्या गटाला तिसरे स्थान प्राप्त झाले. संघाला शारीरिक शिक्षक नितेश जांगळी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापिका शारदा देसाई यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)