शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

विदर्भ निर्मिती-विकासासाठी ‘व्हीजन’ हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 04:12 IST

आपल्या देशात विदर्भासह विविध लहान राज्यांची मागणी समोर येत आहे. लहान राज्यांमध्ये वेगवान विकासाची क्षमता असते. वेगळ्या विदर्भाबाबत तेथील राजकारणी निर्णय घेतील.

योगेश पांडे, वर्धा (छत्तीसगड)आपल्या देशात विदर्भासह विविध लहान राज्यांची मागणी समोर येत आहे. लहान राज्यांमध्ये वेगवान विकासाची क्षमता असते. वेगळ्या विदर्भाबाबत तेथील राजकारणी निर्णय घेतील. विदर्भामध्ये खरोखरच विकासाची प्रचंड क्षमता आहे.परंतु यासाठी केवळ मोठमोठ्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. यासाठी योग्य दृष्टिकोन आणि प्रभावी नेतृत्व आवश्यक आहे, असे मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांनी व्यक्त केले. छत्तीसगड शासनाच्या लोकसुराज मोहिमेदरम्यान त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.वेगळ्या छत्तीसगड राज्याची निर्मिती व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उचलला होता. विदर्भात साधनसंपत्ती उपलब्धआहे. त्यामुळे वेगळे राज्य म्हणून विकासाची प्रचंड संधी आहे. परंतु यासाठी विधिमंडळातून वेगळ््या राज्याचा प्रस्ताव जायला हवा. राज्यनिर्मितीचा हा पहिला टप्पाच जास्त सर्वात जास्त महत्त्वाचा असतो, याकडे डॉ.रमण सिंह यांनी लक्ष वेधले. ‘बस्तर’मधली ती घटना दुर्दैवीनक्षलप्रभावित बस्तरमध्ये काही दिवसांपूर्वी ‘जेएनयूमधील प्राध्यापकांनी जाऊन गावकऱ्यांना प्रशासनाविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले. संबंधित प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आदिवासी क्षेत्रातील लोकांना सरकारविरोधात करण्याचे काही बुद्धिजिवी प्रयत्न करत आहेत. परंतु असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असा दावा त्यांनी केला. प्रशासन आदिवासींना त्रास देत असल्याचा कांगावा नक्षलसमर्थक करतात. परंतु जर सरकार आदिवासी नागरिकांच्या विरोधात असते तर त्यांनी आम्हालाच सलग तीनवेळा कसे निवडून दिले असते, असा प्रश्न डॉ.सिंह यांनी उपस्थित केला.छत्तीसगडची निर्मिती झाली त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु उपलब्ध साधनसंपत्तीच्या जोरावर आमची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. सहा हजार कोटींपासून सुरू झालेला अर्थसंकल्प आता ७६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, असे त्यांनी सांगितले.नक्षलवाद्यांच्या समर्थनात घट, आदिवासींना हवा विकासच्गेल्या काही वर्षांपासून नक्षलप्रभावित बस्तर, सरगुजा, जगदलपूर या भागातील आदिवासी नागरिकांमध्ये जागरूकता येत आहे. त्यांनादेखील रस्ते, वीज, पाणी, रोजगार हा विकास अपेक्षित आहे. नक्षलवाद्यांना गावकऱ्यांकडून मिळणाऱ्या समर्थनात घट होत आहे, असा दावा डॉ.रमण सिंह यांनी केला. सरगुजामधील नक्षलवाद्यांचा प्रभाव फारच कमी झाला आहे. बस्तरमध्येदेखील आम्हाला ७० ते ८० टक्के यश मिळाले आहे. प्रशासनाला नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.