बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त विविध कार्यक्रम
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
सुरगाणा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सुरगाणा शहर व तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर शिवसेना कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सुशिला चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. पुतळ्यास उपजिल्हा प्रमुख योगेश वार्डे, तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्यासपीठावर कार्यकर्ते राजेंद्र माळी, एकनाथ भोये, दत्तात्रेय बोरसे, अर्जून शिंदे, प्रकाश बागुल, मंगेश शेवरे, शहर प्रमुख भरत अप्पा वाघमारे, सरपंच पुष्पाबाई वाघमारे आदि उपस्थित होते.