पणजी : गोव्यातील मंत्री, आमदार ब्राझील दौऱ्यावर रवाना झाले असून, त्यांना ३१ जुलैपर्यंत शासकीय तिजोरीत खर्चाचे पैसे जमा करण्यास सरकारने सांगितले आहे.ब्राझील दौऱ्यावर रवाना झालेले कामगार मंत्री आवेर्तिन फुर्तादो तसेच आमदार बेंजामिन सिल्वा, ग्लेन तिकलो आणि कार्लुस आल्मेदा दहा दिवसांच्या ब्राझील दौऱ्यावर बुधवारी रवाना झाले. जागतिक फुटबॉल स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी ते गेले असून त्यांना गोवा सरकारच्या क्रीडा प्राधिकरणाने विमानांची तिकीटे दिली आहेत. सरकारने शासकीय खर्र्चाने होऊ घातलेला त्यांचा दौरा रद्द करण्यापूर्वीच क्रीडा प्राधिकरणाने (सॅग) सहा मंत्री- आमदारांची विमान तिकीटे मुंबईतील टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे आरक्षित केली होती. सरकारने शासकीय खर्चाने ब्राझिलला जाऊ नका, अशी सूचना मंत्री- आमदारांना करण्यापूर्वीच कंपनीला सरकारकडून पैसे पोहचले होते. त्यामुळे विमान तिकीटे रद्द केली गेली नाहीत. (खास प्रतिनिधी)
‘त्या’ मंत्र्यांना ब्राझील भोवले
By admin | Updated: July 3, 2014 04:34 IST