पणजी : गोव्यातील ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर बिकीनीवर घसरल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी तातडीने पब संस्कृती किंवा बिकीनींच्या वापरावर राज्यात निर्बंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. गोवा सरकार नव्याने पर्यटकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादणार नाही. फक्त समुद्रकिनाऱ्यांवर व अन्य सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करता येणार नाही. अबकारी खाते त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करील, असे पर्रीकर म्हणाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर जे काही बोलले, ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे. प्रत्येकास मत स्वातंत्र्य आहे. मात्र ढवळीकर यांचे वक्तव्य प्रसार माध्यमांत वेगवेगळ््या स्वरुपात पहायला व ऐकायला मिळाले. मला ढवळीकर मला भेटले व त्यांनी जे काही सांगितले ते मला आक्षेपार्ह वाटत नाही, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. पबबाहेर किंवा समुद्रकिनाऱ्यांवर कुणाला दारू पिता येणार नाही, असे ही ते म्हणाले.
गोव्यात पब, बिकिनीवर निर्बंध नाहीत
By admin | Updated: July 3, 2014 04:33 IST