दोन शेतकर्यांच्या आत्महत्या-सुधारित
By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST
बल्लारपूर : सततची नापिकी आणि पावसाने दगा दिल्यामुळे निराश झालेल्या विसापूर येथील एका तरुण शेतकर्याने रेल्वखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेलाईनवर घडली. रामू उर्फ रामभाऊ उपरे असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
दोन शेतकर्यांच्या आत्महत्या-सुधारित
बल्लारपूर : सततची नापिकी आणि पावसाने दगा दिल्यामुळे निराश झालेल्या विसापूर येथील एका तरुण शेतकर्याने रेल्वखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी चंद्रपूर-बल्लारपूर रेल्वेलाईनवर घडली. रामू उर्फ रामभाऊ उपरे असे मृत शेतकर्याचे नाव आहे.तसेच, हिंगोलीतील सेनगाव तालुक्यामधील सवना येथील संतोष साहेबराव नायक (२२) या युवा शेतकर्याने परगावी जाऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. संतोषच्या वडिलांकडे केवळ अर्धा एकर जमीन आहे. मागील दोन वर्षांपासून नापिकीचे संकट ओढवले आहे. बहिणीला अंत्री या गावी भेटीला जातो म्हणून तो शनिवारी घराबाहेर पडला. रिसोड ते लोणी मार्गावर त्याने झाडाला गळफास घेतला.(प्रतिनिधी)