क्रीडा : सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डा उपांत्य फेरीत
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
मडगाव : बाणावली येथील सेंट जॉन बाप्तिस्ता मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या सेंट सेबेस्तियान आंतरग्राम चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डा संघाने आंबेली स्पोर्ट्स क्लब संघाचा निसटत्या एका गोलने पराभव केला़ त्याबरोबरच त्यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
क्रीडा : सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डा उपांत्य फेरीत
मडगाव : बाणावली येथील सेंट जॉन बाप्तिस्ता मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या सेंट सेबेस्तियान आंतरग्राम चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डा संघाने आंबेली स्पोर्ट्स क्लब संघाचा निसटत्या एका गोलने पराभव केला़ त्याबरोबरच त्यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.सामन्याचे पहिले सत्र दोन्ही संघांच्या अथक प्रय}ांनंतर गोलविना राहिले होत़े तर सामन्याचा विजयी एकमेव गोल दुसर्या सत्रात 54 व्या मिनिटाला सुकूर फर्नांडिसकडून फ्री किकच्या संधीवर नोंदविण्यात आला. त्यानंतर आंबेलीच्या संघाला बरोबरी साधता आली नाही. (क्रीडा प्रतिनिधी)