शिरूर-हवेलीतील शिवार करणार जलयुक्त बाबूराव पाचर्णे : न्हावरेत शेतकर्यांना पेरणी अवजारे वाटप
By admin | Updated: February 2, 2015 23:52 IST
न्हावरे : जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा अभिनवय उपक्रम शिरूर-हवेली मतदारसंघात उत्कृष्टपणे राबवून राज्यातून आदर्श निर्माण करण्याचा मानस आमदार बाबूराव पाचर्णे यांनी व्यक्त केला.न्हावरे (ता़ शिरूर) येथे शेतकर्यांना आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते पेरणी औजार यंत्राचे वाटप करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासाईदेवी सहकारी संस्थेचे अध्यक्ष ...
शिरूर-हवेलीतील शिवार करणार जलयुक्त बाबूराव पाचर्णे : न्हावरेत शेतकर्यांना पेरणी अवजारे वाटप
न्हावरे : जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा अभिनवय उपक्रम शिरूर-हवेली मतदारसंघात उत्कृष्टपणे राबवून राज्यातून आदर्श निर्माण करण्याचा मानस आमदार बाबूराव पाचर्णे यांनी व्यक्त केला.न्हावरे (ता़ शिरूर) येथे शेतकर्यांना आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते पेरणी औजार यंत्राचे वाटप करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासाईदेवी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश ढवळे होते़ या वेळी लाभार्थी शेतकर्यांना १९९ पेरणीयंत्र व १४४ रोटावेटर यंत्राचे, तसेच मका बियाण्याचे वाटप करण्यात आले़पाचर्णे म्हणाले, की सरकारची भूमिका ही शेतकरीहिताची आहे़ शासनाच्या वतीने शेतकरीबांधवांसाठी ज्या योजना राबविल्या जात आहेत त्या योजनांच्या माध्यमातून शिरूर तालुक्याला जास्तीचा निधी मिळवून देण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करणार असून, शेतकर्यांनी व कृषी विभागातील कर्मचार्यांनी शेततळी अनुदानीत ट्रॅक्टर, पाचट कुटी यंत्र व इतर कृषी योजनांचे प्रस्ताव वेळेत दाखल करावेत. या कामी लागणारा निधी मिळवून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहील, असे पाचर्णे यांनी सांगितले़या वेळी जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब मगर, तालुका कृषी अधिकारी डॉ़ म्हातारबा कराळे, सर्जेराव साठे, भीमराव गाजरे यांची भाषणे झाली़याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, भाजपाचे तालुका सरचिटणीस माऊली बहिरट, उपाध्यक्ष सुभाष कांडगे, पोपटराव थिटे, दादा ढवळे, शहाजी जाधव, ईक्बाल शेख, कृषी सहायक कांतीलाल वीर, दादा झिंजुर्के, चंद्रकांत आनंदे उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले. आभार महादू गदादे यांनी मानले़न्हावरे (ता़ शिरूर) येथे शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांना कृषी औजाराचे वाटप आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवऱ