धायरी परिसरातील कच-यासाठी पालिकेची स्वतंत्र व्यवस्था
By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST
पुणे : धायरी परिसरात असलेल्या लघु उद्योजकांच्या कारखान्यांमधील औद्योगिक कचरा संकलनासाठी महापालिकेकडून स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. टिळकरस्ता क्षेत्रीय कार्यालयाने यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक आठवडयात मंगळवारी आणि शुक्रवार या दोन दिवशी हा कचरा उचलला जाणार आहे. या ठिकाणी सुमारे तीन ते चार टन कचरा प्रत्येक तीन दिवसांमध्ये साठतो.
धायरी परिसरातील कच-यासाठी पालिकेची स्वतंत्र व्यवस्था
पुणे : धायरी परिसरात असलेल्या लघु उद्योजकांच्या कारखान्यांमधील औद्योगिक कचरा संकलनासाठी महापालिकेकडून स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. टिळकरस्ता क्षेत्रीय कार्यालयाने यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक आठवडयात मंगळवारी आणि शुक्रवार या दोन दिवशी हा कचरा उचलला जाणार आहे. या ठिकाणी सुमारे तीन ते चार टन कचरा प्रत्येक तीन दिवसांमध्ये साठतो. धायरी परिसरातील बारंगळे मळा, दळवीवाडी तसेच डीएसके रस्त्याच्या परिसरात सुमारे 70 ते 80 लहान मोठी औद्योगिक शेड आहेत. या ठिकाणच्या कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने ही समस्या आणखी वाढली होती. ही समस्या सोडविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाने पुढाकार घेत, या ठिकाणचा कचरा संकलन करण्यासाठी आठवडयातून दोन दिवस स्वतंत्र गाडी संकलनासाठी देण्यात येणार आहे. या वाहतूक व्यवस्थेची सुरूवात नुकतीच करण्यात आली. स्थानिक नगरसेविका युगंधरा चाकणकर, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, आरोग्य निरिक्षक सुहास पांढरे, गणेश कांबळे, पपीचंद श्रीमाळ यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते.=============फोटो आहेराऊत लॉगईन मध्ये 22 कचरा या नावाने..