शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गुप्त फाईल सार्वजनिक

By admin | Updated: September 19, 2015 08:31 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ फाईल्स पश्चिम बंगाल सरकारने शुक्रवारी सार्वजनिक केल्या. गेल्या अनेक वर्षांपासून लॉकरमध्ये बंद असलेल्या या गोपनीय

कोलकाता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ फाईल्स पश्चिम बंगाल सरकारने शुक्रवारी सार्वजनिक केल्या. गेल्या अनेक वर्षांपासून लॉकरमध्ये बंद असलेल्या या गोपनीय फाईल्स खुल्या झाल्याने नेताजींच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने नेताजींबाबतच्या फाईल सार्वजनिक केल्यानंतर आता केंद्रानेही आपल्याकडील नेताजींसंदर्भातील दस्तऐवज उघड करावेत, अशी मागणी होत असून केंद्र सरकारवरील दबाव वाढला आहे.प. बंगाल सरकारने या फाईल्स सामान्यांसाठी खुल्या केल्या जातील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी १२,७४४ पानांच्या ६४ फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या. नेताजींच्या कुटुंबातील सदस्य यावेळी हजर होते. या फाईल्स कोलकाता पोलीस संग्रहालयात काचेच्या पेटीत प्रदर्शित केल्या जातील. सोमवारपासून सामान्य जनता त्या बघू शकेल, असे शहर पोलीस आयुक्त सुरजित कार पुरकायस्थ यांनी सांगितले. या फाईल्सची डिजिटल प्रत अर्थात डीव्हीडी नेताजींच्या कुटुंबियांना सोपवण्यात आली आहे. या फाईल्स १९३७ ते १९४७ दरम्यानच आहे. काही हस्तलिखित नोट्स, नेताजी आणि त्यांचे बंधू शरत्चंद्र यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे यात आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार, या फाईल्समधून नेताजी किमान १९६४ पर्यंत जिवंत असल्याची माहिती मिळते. सन १९६० च्या दशकात अमेरिकेने तयार केलेला एक अहवालही यात आहे. नेताजी फेबु्रवारी १९६४ मध्ये भारतात परतले होते, असा हा अहवाल सांगतो. १९४५ मध्ये नेताजी अचानक बेपत्ता झाले होते. १७ आॅगस्ट १९४५ रोजी ते बँकॉक विमानतळावर अखेरचे दिसले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये झालेल्या विमान अपघातात नेताजींचा कथित मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र याचे कुठलेही पुरावे नाहीत. मुखर्जी आयोगाने तैवानमधील विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे मत फेटाळले होते. त्यानंतर नेताजींचे लहान बंधू आणि नेताजी चौकशी समितीचे एक सदस्य सुरेश बोस यांनी नेताजींचा मृत्यू १९७२ मध्ये झाल्याचे शपथेवर सांगितले होते. यानंतरही आजतागत नेताजींच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.