शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
3
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
4
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
5
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
6
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
7
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
8
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
9
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
10
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
11
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
12
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
13
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
14
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
15
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
16
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
17
Shefali Jariwala: "सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
18
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
19
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
20
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...

रेडीरेकनरच्या दरवाढीवर लवकरच तोडगा महसूलमंत्र्यांचे आश्वासन : उपमुख्यमंत्र्यांसमवेत होणार बैठक

By admin | Updated: May 30, 2014 00:34 IST

नाशिक : शहरातील जमिनीचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरच्या दरवाढीमुळे बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले असून, त्यामुळे व्यवहारच ठप्प झाले आहेत. त्यामुळे रेडीरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

नाशिक : शहरातील जमिनीचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरच्या दरवाढीमुळे बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले असून, त्यामुळे व्यवहारच ठप्प झाले आहेत. त्यामुळे रेडीरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.रेडीरेकनरची अवास्तव दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव, क्रेडाईचे राज्य अध्यक्ष अनंत राजेगावकर आणि नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी अन्य पदाधिकार्‍यांसमवेत संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी थोरात यांनी सदरचे आश्वासन दिले.नाशिकमध्ये रेडीरेकनरचे दर सुमारे ३५ ते ४० टक्के अधिक वाढले आहेत. ही अवास्तव दरवाढ असल्याने बांधकाम क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित २०६ व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत बांधकाम आणि जमीन व्यवहाराच्या मुद्रांक शुल्कापोटी ४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्या आधारे राज्य शासनाला यंदा ६६ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्षात मात्र केवळ ३६ कोटी रुपये इतकाच महसूल मिळाला आहे. रेडीरेकनरमुळे केवळ विकासक आणि नागरिकांचेच नव्हे, तर शासनाचेदेखील अशाच प्रकारे नुकसान झाल्याचे थोरात यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. अगोदरच मंदीचे वातावरण आहे. त्यात ही दरवाढ लागू झाल्याने शासनाचेदेखील नुकसान होत असून, सदरची दरवाढ रद्द करून गेल्यावर्षीचेच दर कायम ठेवावे, असे यावेळी सांगण्यात आले. दरवाढ रद्द करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन थोरात यांनी दिले आहे.या बैठकीस सचिव नरेश कारडा, उपाध्यक्ष अभय तातेड, राजू ठक्कर, सुनील कोतवाल, उमेश वानखेडे, कृणाल पाटील तसेच दिनेश बच्छाव उपस्थित होते.