पदवीधर मतदारसंघ : डिसेंबरला निवडणूक जाहीर होण्याची शक्यतागणेश धुरीनाशिक : जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या तोेंडावरच नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघातील निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात ही पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत अहमदनगर जिल्ातीलच दोन्ही उमेदवारांमध्ये निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र नाशिकमधूनही भाजपाकडून इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने नाशिक आणि अहमदनगर जिल्ात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक खर्या अर्थाने रंगतदार होऊ शकते.गेल्या काही महिन्यांपासूनच विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पदवीधर निवडणुकीसाठी दुसर्यांदा निवडणूक लढण्याची तयारी केलेली असली तरी यंदा त्यांना घरातूनच अर्थात अहमदनगर जिल्ातूनच डॉ. बिपीन कोल्हे यांच्या रूपाने आव्हान मिळण्याची शक्यता आहे. मात्र आधीच घरात एक आमदारकी असल्याने कोल्हे कुटुंबीयांना दुसर्या आमदारकीसाठी संघर्ष करण्यात रस नसल्याचे बोलले जात आहे. अर्थात पक्षादेश मानून त्यांनी उमेदवारी केलीच, तर डॉक्टरांना दुसर्यांदा आमदार होण्यासाठी जालीम उपाय करावे लागतील. भाजपाकडून मोदी लाटेवर स्वार होऊन पदवीधर आमदार होण्यासाठी भाजपामध्येच स्पर्धा लागली आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून उमेदवारी करणारे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे आता नव्यानेच भाजपात प्रवेश केलेले क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक व भाजपाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे नातलग डॉ. प्रशांत पाटील अशा त्रिमूर्तींमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस आहे. अर्थात भाजपाकडून मागील वेळी उमेदवारी करणारे प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यावेळी निवडणूक लढविण्यास काहीसे अनुत्सुक असल्याचे बोलले जाते. घरातच पत्नी प्रा. देवयानी फरांदे यांच्या रूपाने आमदारकी असल्याने पक्षांतर्गत टीका नको म्हणून प्रा. सुहास फरांदे उमेदवारी करण्यास अनुत्सुक असल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बायपास झाल्याने ते प्रकृती कारणास्तवही निवडणूक लढविणे टाळू शकतात. मागील वेळी नाशिकचे मतदार ९० हजार, तर अहमदनगरचे ९२ हजार मतदार होते. मतदारसंघ पाच जिल्हे व भौगोलिकदृष्ट्याही मोठा असल्याने उमेदवारांचा ऐन हिवाळ्यात घाम निघणार आहे.इन्फो..अशी आहे मतदारसंख्या- (मतदारसंख्येच्या आकडेवारीत बदल होऊ शकतो.)अहमदनगर- १ लाख ३ हजार २०६, नाशिक- १ लाख ६ हजार, धुळे- ३३ हजार ८०६, नंदुरबार- १४ हजार ५९८, जळगाव- ५४ हजार ९७२ अशी एकूण सुमारे ३ लाख १० हजार इतकी आहे.
नगर-नाशिकमध्येच रंगणार खरी झुंज
By admin | Updated: May 22, 2016 23:15 IST