(वाचली) कारवाईच्या निषेधार्थ वाहनमालकाचा आत्मदहनाचा इशारा - ताब्यात घेतलेली कागदपत्रे, डंपर सोडला - प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रकार
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने काल, गुरुवारी रात्री क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक करणार्या दोन अवजड वाहनांवर कारवाई करीत दंड व ताब्यात घेण्याची कारवाई केली. याच्या निषेधार्थ वाहनचालकांच्यावतीने वडगावचे माजी नगरसेवक प्रकाश भोसले यांनी आज, शुक्रवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात आम्हालाच लक्ष्य का करता, म्हणून आत्मदहनाचा इशारा देत गोंधळ घातला. यामुळे काही काळ कार्यालयात तणाव निर्माण झाला.
(वाचली) कारवाईच्या निषेधार्थ वाहनमालकाचा आत्मदहनाचा इशारा - ताब्यात घेतलेली कागदपत्रे, डंपर सोडला - प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रकार
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने काल, गुरुवारी रात्री क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक करणार्या दोन अवजड वाहनांवर कारवाई करीत दंड व ताब्यात घेण्याची कारवाई केली. याच्या निषेधार्थ वाहनचालकांच्यावतीने वडगावचे माजी नगरसेवक प्रकाश भोसले यांनी आज, शुक्रवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात आम्हालाच लक्ष्य का करता, म्हणून आत्मदहनाचा इशारा देत गोंधळ घातला. यामुळे काही काळ कार्यालयात तणाव निर्माण झाला. गुरुवारी रात्री प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने राष्ट्रीय महामार्गावर क्षमतेपेक्षा जादा माल वाहतूक करणार्या डंपर, ट्रकवर कारवाई करीत दंड व गाड्या ताब्यात घेण्याची कारवाई केली. कारवाईर् करण्यात आलेल्या दोन्ही गाड्या वडगाव येथील माजी नगरसेवक प्रकाश भोसले यांच्या रस्ते बांधकामावर होत्या. त्यामुळे भोसले यांनी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन कार्यालयातील अधिकार्यांना ट्रक ताब्यात घेताना ड्रायव्हरचा मोबाईल व कागदपत्रे का काढून घेतली, असा जाब विचारत मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळामुळे कार्यालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर अधिकार्यांनी कारवाई मागे घेत त्यांची कागदपत्रे त्यांच्या ताब्यात दिली. -----कोटकागदपत्रे व गाड्या सोडल्यागुरुवारी रात्री आमच्या गु्रपमधील दोन डंपरवर प्रादेशिक परिवहनच्या भरारी पथकाने अनसेफ कंडिशन व क्षमतेपेक्षा जादा भाराबद्दल दंडात्मक कारवाई करीत चालकांना वाहनमालकांशी संपर्क साधायचा नाही म्हणून मोबाईल फोन काढून घेत दमटाटी केली. रस्तेकामात वाहनामध्ये किती माती लोड केली, हे समजत नसल्याने दोन हजार किलो माती जादा भरण्यात आली. यावर अधिकार्यांना मी तुमचा दंड भरण्यास तयार आहे. मात्र, दोन दिवस तुम्ही माझे नुकसान केले. तुमचा दंड घ्या; परंतु कागदपत्रे व ताब्यात घेतलेली वाहने परत द्या, असे सांगितले. मात्र, कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा अधिकार्यांनी दिला. यावर तुम्ही आमच्यासारख्यांना लक्ष्य करता असे म्हणून मी त्यांना आत्मदहनाचा इशारा दिला. यावर कार्यालयाने माझी कागदपत्रे व वाहने परत दिली. - प्रकाश भोसले, माजी नगरसेवक, वडगाव