प्रज्ञा - अध्यक्षपदी शंकर टेमगिरे
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
अवसरी : अवसरी-आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शंकर बबुशा टेमगिरे यांची मतदान पद्धतीने निवड झाल्याची माहिती पोलीस पाटील वैशाली टेमगिरे यांनी दिली.
प्रज्ञा - अध्यक्षपदी शंकर टेमगिरे
अवसरी : अवसरी-आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शंकर बबुशा टेमगिरे यांची मतदान पद्धतीने निवड झाल्याची माहिती पोलीस पाटील वैशाली टेमगिरे यांनी दिली.स्वातंत्र्य दिनानिमित्त थोरांदळे गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा अध्यक्ष निवडीच्या वेळी इच्छुकांची संख्या तब्बल १९ इतकी झाली. या वेळी गावच्या पोलीस पाटील वैशाली टेमगिरे यांनी इच्छुकांना माघार घेण्यासाठी समजून संागण्याचा प्रयत्न केला; परंतु इच्छुकांनी माघार घेतली नाही. सर्वानुमते मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला.उपस्थित ग्रामस्थांचे मतदान घेण्यात आले. या वेळी ९३ जणांनी मतदान केले. शंकर टेमगिरे यांना सर्वाधिक ४८ मते मिळाली. त्यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी आदर्श सरपंच सीताराम गुंड, सुरेश टेमगिरे, शांताराम टेमगिरे, नामदेव टेमगिरे, कोंडीभाऊ टेमगिरे, मंगेश टेमगिरे, श्याम टेमगिरे, बाळासाहेब मिंडे, ग्रामपंचायत सदस्या जयवंताबाई टेमगिरे, प्रमिला टेमगिरे, बाबाजी मिंडे, बाळू मिंडे आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)सोबत- शंकर टेमगिरे आयकार्ड फोटो.०००