तेलकुडगावात यात्रौत्सवास प्रारंभ
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
गुरुवारी कुस्त्यांचा जंगी हगामा
तेलकुडगावात यात्रौत्सवास प्रारंभ
गुरुवारी कुस्त्यांचा जंगी हगामाकुकाणा : नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र चैतन्य नागनाथ महाराज देवस्थानच्या यात्रौत्सवास महाशिवरात्री मंगळवार, दि. १७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व गुरुवार, दि. १९ रोजी कुस्त्यांचा जंगी हगामा होणार आहे. या यात्रौत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.या यात्रौत्सवास बाबासाहेब महाराज मतकर यांच्या किर्तनाने सुरुवात झाली आहे. यावेळी जनार्धन गटकळ, पांडुरंग गटकळ, सरपंच संगीता सरोदे यांच्या वतीने उपस्थित भाविकांना फराळाचा महाप्रसाद देण्यात आला. चैतन्य नागनाथ महाराज यांचे हे जागृत देवस्थान असून, येथील भाविक पैठण येथून कावडी गंगाजल आणून त्याची बुधवारी सवाद्य मिरवणूक काढून सकाळी ११ वाजता महाराजांच्या मुर्तीस गंगाजल स्नान अभिषेक व रात्री छबीना मिरवणूक शोभेच्या दारूची आतषबाजी तर तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा आणि गुरुवार, दि. १९ रोजी हनुमान मंदिरासमोर हजेर्यांचा कार्यक्रम व दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. मिठाई, दुकानदार, कलाकार व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, तसेच या हगामाप्रसंगी जिल्ह्यातील नामवंत मल्ल हजेरी लावतात. त्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला जातो, असे यात्रा कमिटीचे अध्यक्ष हनुमंतराव गटकळ व सचिव मेजर अर्जुनराव गायकवाड यांनी सांगितले.