शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाक ‘विशेष पसंती’ घालवणार?

By admin | Updated: September 28, 2016 01:27 IST

पाकिस्तानला देण्यात आलेल्या विशेष पसंतीचा देश (मोस्ट फेव्हर्ड नेशन-एमएफएन) या दर्जाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत

नवी दिल्ली : पाकिस्तानला देण्यात आलेल्या विशेष पसंतीचा देश (मोस्ट फेव्हर्ड नेशन-एमएफएन) या दर्जाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल. सोमवारीच मोदी यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील सिंधू नदी पाणीवाटप कराराचा आढावा घेतल्यानंतर पाकिस्तानला दिलेल्या दर्जाचा आढावा घ्यायचा निर्णय घेतला. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकसोबतचे संबंध हे पूर्वीसारखे असणार नाहीत हे स्पष्ट केले आहे.पाकिस्तानला दिल्या गेलेल्या एमएफएन दर्जाचा आढावा घ्यायचा मोदी यांचा प्रयत्न हा पाकिस्तानला प्रत्यक्ष युद्धाऐवजी आर्थिक पातळीवर वेगळे पाडण्याच्या ठरवून चाललेल्या धोरणाचा भागच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारत पाकिस्तानला वेगळे पाडू इच्छितो याचे स्पष्ट संकेत या निर्णयातून दिले जाऊ शकतात. अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय व्यापार तसा नगण्य असल्यामुळे पाकिस्तानवर त्याचा फार परिणाम होणार नाही. तथापि, व्यापक विचार करता भारताने पाकिस्तानबाबत राबवायच्या धोरणाचा फेरविचार सुरू केल्यामुळे हा निर्णय महत्वाचा ठरेल. मोदी पाकिस्तानला जागतिक व्यापार संघटनेच्या वाद निवारण मंडळापुढे उभे करण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसे झाल्यास भारताने पाकिस्तानला दिलेल्या एमएफएन दर्जाअंतर्गत त्याला मिळणारे फायदे काढून घेण्यास भारताला परवानगी मिळेल. डब्ल्यूटीओच्या नियमांनुसार देश त्यांच्या व्यापार भागीदार देशांशी सामान्य परिस्थिीत भेदभाव करू शकत नाहीत. कोणाला विशेष पसंती देणे (उदा. कस्टम्स ड्युटीचा दर त्यांच्या एखाद्या उत्पादनासाठी कमी करणे). आणि तुम्हाला अशी सवलत डब्ल्यूटीओच्या इतर सदस्यांनाही द्यावी लागते. (लोकमत न्यूज नेटवर्क)विशेष पसंतीचा दर्जा म्हणजे काय?भारताकडून पाकिस्तानला विशेष पसंतीचा देश दर्जा १९९६ मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) गॅट (जनरल अ‍ॅग्रिमेंट आॅन टॅरीफस अँड ट्रेड) करारांतर्गतदिला गेला. भारत आणि पाकिस्तान यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत. या कराराचा अर्थ असा की या दोन्ही देशांनी एकमेकांना सारखीच वागणूक द्यावी आणि डब्ल्यूटीओच्या सदस्य देशांना पसंतीचे व्यापारी भागीदार असे समजावे. तथापि, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार भारताच्या एकूण व्यापाराच्या केवळ ०.४ टक्केच आहे.