पान ६-(आवश्यक) वाचक संवाद
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
अमृतसिंग यांच्यावरील
पान ६-(आवश्यक) वाचक संवाद
अमृतसिंग यांच्यावरीलहल्ला निषेधार्हगुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी समाजकंटकांनी पूर्वनियोजितपणे गोवंश रक्षक ॲड. हनुमंत परब, तसेच प्राणिमित्र अमृतसिंग यांच्यावर रात्रीच्या वेळी चोर्ला घाटात केलेला प्राणघातक खुनी हल्ला निषेधार्ह आहे. चार-पाच मोटारगाड्यांतून हत्यारबंद येऊन वाटेत गाडी अडवून गोवंश रक्षकांवर झालेल्या हल्ल्याचे आणि झालेल्या जखमांचे स्वरूप पाहता बेकायदेशीर गोवंश हत्या चालवलेल्या लॉबीने पद्धतशीरपणे त्यांचा काटा काढण्याच्या उद्देशानेच केलेला हा हल्ला आहे, असे म्हणावे लागते. गेल्या काही वर्षांत गोवंश हत्याबंदीच्याच चौकटीत राहून या गोवंश रक्षक कार्यकर्त्यांनी सर्रास बेकायदेशीर गोवंश कत्तलीचे अनेक प्रकार, अनेक घटना उघडकीस आणल्यामुळेच त्यांना संपविण्यासाठी सूडबुद्धीने केलेला हा भ्याड हल्ला आहे. गोमंतकीय जनता हे कदापि सहन करणार नाही. पोलिसांनी दबावाला बळी न पडता त्वरित छडा लावून योग्य ती कारवाई करून लोकक्षोभ टाळावा.- प्रा. सुभाष भाटकर वेलिंगकर