पान ५ कामुर्ली आरोग्य शिबिरात तपासणी
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
कामुर्ली : निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी गरजेची असल्याचे आवाहन निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप शिरगावकर यांनी केले. कामुर्लीत झालेल्या मोफत आरोग्य श्िबिरात ते बोलत होते. हे शिबिर गोमंत मराठा समाजातर्फे मुड्डावाडा-बाराजण येथे भरविण्यात आले होते. या वेळी शंभर रुग्णांची तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह व न्युरोपॅथी तपासणी करण्यात आली. डॉ. गौरव आसगावकर, डॉ. रक्षा शिरोडकर व डॉ. संजक्ता साळगावकर यांनीही रुग्णांची तपासणी केली. मराठा समाजाच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पान ५ कामुर्ली आरोग्य शिबिरात तपासणी
कामुर्ली : निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी गरजेची असल्याचे आवाहन निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप शिरगावकर यांनी केले. कामुर्लीत झालेल्या मोफत आरोग्य श्िबिरात ते बोलत होते. हे शिबिर गोमंत मराठा समाजातर्फे मुड्डावाडा-बाराजण येथे भरविण्यात आले होते. या वेळी शंभर रुग्णांची तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह व न्युरोपॅथी तपासणी करण्यात आली. डॉ. गौरव आसगावकर, डॉ. रक्षा शिरोडकर व डॉ. संजक्ता साळगावकर यांनीही रुग्णांची तपासणी केली. मराठा समाजाच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी) फोटो : कामुर्ली येथे आरोग्य शिबिरात तपासणी करताना डॉक्टर्स. (जयेश नाईक) १७०२-एमएपी-०५, ०६