पान 2--गोल्र्फ कोर्ससाठी
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
गोल्फ कोर्ससाठी
पान 2--गोल्र्फ कोर्ससाठी
गोल्फ कोर्ससाठीनव्याने आव्हानपणजी : तेरेखोल येथील लिडिंग हॉटेलच्या गोल्फ कोर्स रिसॉर्ट्ससाठी जो पर्यावरणविषयक दाखला देण्यात आला आहे, त्या दाखल्याला आव्हान देणारा नवा अर्ज राष्ट्रीय हरित लवादास सादर करण्याचे गोवा फाउंडेशन संस्थेने ठरविले आहे. त्यासाठी तांत्रिक धोरणाचा भाग म्हणून फाउंडेशनने आपली आव्हान याचिका मागे घेतली आहे; पण याच गोल्फ कोर्सला मिळालेल्या सीआरझेडविषयक मान्यतेविरुद्धची फाउंडेशनची आव्हान याचिका लवादासमोर कायम आहे. पर्यावरण दाखला व सीआरझेडविषयक मान्यता देताना बेबनाव झाल्याचे आपले म्हणणे कायम असून पर्यावरणविषयक दाखल्याविरुद्ध आम्ही नव्याने लवादास अर्ज सादर करू, असे क्लॉड अल्वारिस यांनी जाहीर केले आहे. (खास प्रतिनिधी)