पान २ : १२वी परिक्षा
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
बारावीच्या परीक्षेसाठी यंदा २0
पान २ : १२वी परिक्षा
बारावीच्या परीक्षेसाठी यंदा २0 महाविद्यालयांत अतिरिक्त आसन व्यवस्था पणजी : २ मार्च पासून सुरू होणार्या १२ वीच्या परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शिक्षण मंडळाने राज्यातील सुमारे २० महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त जागा निर्माण करण्यासंबंधी हालचाली चालवल्या आहेत.शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा १२ वीच्या परीक्षेसाठी सुमारे १६ हजार विद्यार्थी बसणार आहेत. विद्यार्थ्यांची वाढीव संख्या लक्षात घेता सुमारे ३ हजार अतिरिक्त जागा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने शिक्षण मंडळाने त्या दिशेने पावले टाकली आहेत. केपे आणि सत्तरी भागांत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्यासाठी आतापासून तयारी चालवली आहे. मंडळाने तालुकानिहाय विद्यार्थ्यांची यादी केली असून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बसण्याची सोय करण्यात येणार आहे. यंदा बारावीच्या विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांचा गोंधळ, तसेच गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाने आतापासून प्रयत्न चालवले आहेत. (प्रतिनिधी)