ेवेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
पुणे : वेश्याव्यवसायास मुलींना प्रवृत्त करून उपजिविका केल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २० फेब्रुवारीपयंर्त पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
ेवेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक
पुणे : वेश्याव्यवसायास मुलींना प्रवृत्त करून उपजिविका केल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २० फेब्रुवारीपयंर्त पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.गोपाळ पंडु पुजारी (वय ३५, रा. भेकराईनगर, हरपळेचाळ, फुरसुंगी, हवेली) असे आरोपीचे नाव आहे. लोणीकाळभोर पोलिसांनी १० सप्टेंबर २०१४ ला या गुन्ामध्ये यापुर्वी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. तर याच गुन्ात एक अज्ञात महिला आरोपी फरार आहे. सहायक निरीक्षक एस. एन. हुलवान यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी १० सप्टेंबर २०१४ ला सायंकाळी कात्रज बायपास रोडवरील, शेवाळवाडी येथील उरुळीदेवाची परिसरातील श्रीमंत लॉज येथे छापा टाकला असता तेथुन पाच तरूणींची वेश्याव्यवसायाातुन सुटका केली. हा लॉज आरोपी श्रीमंत याने चालवायास घेतला होता. तर आरोपी पुजारी आणि फरार महिला या दोघांनी या व्यवसायातून मिळालेली रक्कम स्वत:कडे ठेवली आणि बाकीच्या आरोपींनी त्यांना वेश्याव्यवसाय चालवण्यास मदत केली. सध्या अटक आरोपी पुजारीकडून फरारी महिलेचा पत्ता घेवुन शोध करण्यासाठी, यात आणखी कोणी साथीदार आहेत का याची चौकशी करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील ए. के. पाचारणे यांनी केली. न्यायालयाने युक्तिवाद ग्राहय धरला.