(निनाद) श्री वाघेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
महाशिवरात्री : विविध कार्यक्रमांचे आयोजन
(निनाद) श्री वाघेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक
महाशिवरात्री : विविध कार्यक्रमांचे आयोजन मांडवगण फराटा : येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वराच्या यात्रेस सुरुवात झाली. ही यात्रा तीन दिवस चालणार आहे. यात्राकाळात ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त हजारो नागरिकांनी वाघेश्वराचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त पहाटे देवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी पालखीतून मिरवणूक कढण्यात आली. या वेळी श्री वाघेश्वरास भीमा नदीवर मूर्तिस्नान घालण्यात आले. येथील ब्रााकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने श्री वाघेश्वर मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली होती. सायंकाळी आरती व रात्री साडेनऊ ते १ पर्यंत मांडवगण फराटा भजनी मंडळाचा हरिजागर तसेच बुधवारी (दि. १८) सकाळी श्रींचा अभिषेक, सायंकाळी ६ ते ९ शेरण्या, रात्री १० ते १२ छबीना व शोभेचे दारूकाम व रात्री १२ ते सकाळी ६ मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. गुरुवारी (दि. १९) सकाळी ९ ते दुपारी १ हजेर्यांमध्ये नटखट अप्सरा हा लावण्यांचा कार्यक्रम, दुपारी ३ ते ६ कुस्त्यांचा आखाडा तसेच रात्री ९ वाजता मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेनिमित्त भरविण्यात येणार्या कुस्त्यांच्या आखाड्यात मल्लांच्या वजनगटानुसार कुस्त्या लावण्यात येणार आहेत. दि. १९ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत येथील मारुती मंदिरात पैलवानांची वजने घेतली जाणार आहेत, अशी माहिती यात्रा कमिटीने दिली आहे.सोबत : ग्रामदैवत श्री वाघेश्वराचा फोटो व शोभायात्रेचा फोटो.फोटो ओळी : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्रीवाघेश्वर. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक.