नाशिक : शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने प्रभाग अध्यक्षांच्या निवडणुका उत्साहात पार पडल्या. त्यामुळे पुढील टप्प्यातील निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे.राष्ट्रवादीचे सदस्य नोंदणी अभियान नुकतेच झाले. त्यानंतर आता सहा विभागातील ६१ प्रभाग अध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. दोन वर्षांनी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यामुळे आतापासूनच या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांनी केले. यावेळी निवडणूक अधिकारी महेश भामरे, मुख्तार शेख, पद्माकर पाटील, अरुण काळे, ज्ञानेश्वर पवार, मनोहर बोराडे आदि उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या प्रभाग अध्यक्ष निवडणुका उत्साहात
By admin | Updated: March 24, 2015 23:40 IST