मारहाण करून महिलेचा विनयभंग
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
श्रीरामपूर : एका महिलेस मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना हरेगाव येथे घडली.
मारहाण करून महिलेचा विनयभंग
श्रीरामपूर : एका महिलेस मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना हरेगाव येथे घडली.याबाबत हरेगाव येथील महिलेने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सचिन कदम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ जूनला दुपारी २.३० वाजता फिर्यादी व तिच्या मुलास कदम याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अर्वाच्च शिविगाळ करीत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हेडकाँस्टेबल आर. बी. पितळे व अरविंद चव्हाण तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)