शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

मोदी वाराणसी राखणार, बडोद्यातील खासदारकी सोडणार

By admin | Updated: May 29, 2014 13:14 IST

लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील बडोदा भरघोस मताधिक्याने विजय मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बडोदा येथील खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन टीम
अहमदाबाद, दि. २९ - लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील बडोदा आणि उत्तरप्रदेशमधील वाराणसीतून भरघोस मताधिक्याने विजय मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आता वाराणसीची खासदारकी राखत बडोदा येथील खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. या जागेवरुन आता मोदींचे विश्वासू साथीदार अमित शहा यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे.
पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींना दोन्हीपैकी एका मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गुजरात हा मोदींचा बालेकिल्ला आहे. तर उत्तरप्रदेशमध्ये भाजपला ८० पैकी ७३ जागा मिळाल्या असून हे मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवल्याने शक्य झाले होते. त्यामुळे मोदींनी आता गुजरातऐवजी उत्तरप्रदेशकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे  मोदी वडोदरा मतदारसंघातून राजीनामा देतील असे सूत्रांनी सांगितले. 
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी बडोदा व वाराणसी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. बडोदा हा मोदींचा गड असल्याने या मतदार संघातून त्यांचा विजय निश्चित होता. या मतदारसंघात त्यांनी काँग्रेसच्या मधुसूदन मिस्त्री यांना तब्बल साडे पाच लाखांहून अधिक मतांनी धूळ चारत विजय मिळवला होता. तर वाराणसीत मोदींनी आपच्या अरविंद केजरीवाल यांच्यावर सुमारे चार लाख मतांनी विजय मिळवला होता. 
अद्याप मोदी किंवा भाजपने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मोदींनी राजीनामा दिल्यास या मतदारसंघात पुन्हा निवडणूक होईल. यात भाजपकडून उमेदवार म्हणून अमित शहांचे नाव आघाडीवर आहे.