टास्कमास्टरची प्रचिती : 100 दिवसांच्या कामावरून असमाधान
नवी दिल्ली: ‘मी हेडमास्टर नाही, पण टास्कमास्टर जरूर आहे’ असे शिक्षकदिनी स्वत:चे स्वभाववैशिष्टय़ देशभरातील विद्याथ्र्याना सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी वास्तवातही तसेच आहेत याचा अनुभव त्यांच्या सहकारी मंत्र्यांना आठवडाभरात दोनदा आला. सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्य अहवालावरून मोदींनी 15 मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे तर आणखी एका मंत्र्याला असा अहवाल प्रसिद्ध कराताना पत्रकारांना भेटवस्तू दिल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीतच जाहीर समज दिल्याचे वृत्त आहे.
प्रत्येक खात्याच्या मंत्र्याने पहिल्या 1क्क् दिवसात करायच्या कामांचा ठोस आराखडा तयार करावा व ही मुदत संपल्यावर प्रत्यक्षात काय कामगिरी झाली याचा अहवाल आपल्याला देण्यासह जनतेपुढेही ठेवावा, असे मोदींनी सांगितले होते. सरकारला 1क्क् दिवस पूर्ण झाल्यानंतर मोदी यांना याचा जातीने आढावा घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी ही नाराजी व्यक्त केली व जाहीर समज दिली, असे समजते.
मंत्र्यांनी आपली बाजू मांडण्याचे प्रयत्न केल़े मात्र त्यामुळे मोदींचे समाधान झाले नाही व यापुढे असे काहीही घडता कामा नये, अशी स्पष्ट समज त्यांनी दिली़
निकटवर्तीयांसह अनेकांना दिली समज
नाराजीचे कारण काय?
या 15 मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या खात्याच्या 100 दिवसांच्या कामाचा अहवाल मांडला नाही म्हणून पंतप्रधान मोदी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
अनंत गीतेंसह 15 जण
पंतप्रधानांची नाराजी ओढवून घेतलेल्या मंत्र्यांमध्ये शिवसेनेचे एकमेव मंत्री अनंत गिते यांच्यासह डॉ. हर्षवर्धन, धमेंद्र प्रधान, संतोष गंगवार, हरसिमरत कौर बादल, मेनका गांधी, राधामोहन सिंग, नजमा हेपतुल्ला, राव इंद्रजीत सिंग, श्रीपाद नाईक, उमा भारती, जनरल व्ही.के. सिंग व अनंत कुमार यांचा समावेश असल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे.
खुलासा मागवला
या सर्व मंत्र्यांकडून मोदींनी खुलासा मागविला आहे व यापुढे नेमून दिलेल्या कामाच्या बाबतीत यापुढे अशी शिथिलता दिसणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचेही सूत्रंनी नमूद केले.
मंत्र्याला भेटवस्तू भोवल्या
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींनी, त्यांच्या अत्यंत विश्वासू अशा मंत्र्याला सर्वासमक्ष समज दिल्यानंतर इतर मंत्र्यांविषयीच्या नाराजीचे हे वृत्त आहे. आपल्या खात्याचा कार्यअहवाल प्रसिद्ध करताना या मंत्र्याने काही पत्रकारांना भेटवस्तू वाटल्या होत्या. हा प्रकार मोदींच्या कानी गेल्यावर त्यांनी कोणीही प्रसिद्धीसाठी अशाप्रकारे भेटवस्तू देऊ नयेत, असे संबंधित मंत्र्याला सुनावले.
खुशमस्करी
करू नका
स्वच्छ प्रशासनासोबत आपली शिस्तप्रिय प्रतिमा निर्माण करण्याचे मोदींचे प्रयत्न आहेत़ पंतप्रधान बनल्यानंतर विदेशी दौ:यांवर विविध वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना सोबत नेण्याची प्रथाही त्यांनी बंद केली आह़े कुणाचीही खुशमस्करी करू नका, असा स्पष्ट संदेशही मोदींनी आपल्या सहका:यांना यातून दिला आह़े
कामावर विश्वास,
पण गय नाही
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी समज दिलेला मंत्री त्यांच्या विश्वासू गटातील मानला जातो़ धोरण आणि व्यापारविषयक मुद्यांवर चांगली पकड असल्याने मोदींना या युवा मंत्र्यावर प्रचंड विश्वास आह़े याची पावती म्हणून मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वपूर्ण खाते देण्यात आले आह़े मात्र याउपरही ‘झीरो टॉलरन्स’च्या धोरणाला बगल न देता मोदींनी या मंत्र्याला सर्वादेखत समज दिली़ या मंत्र्याने आपल्या मंत्रलयाच्या प्रसिद्धीसाठी काही पत्रकारांना भेटवस्तू दिल्या होत्या़ प्रत्यक्षात याआधीच्या सरकारमध्येही पत्रकारांना अशा भेटवस्तू देण्याची प्रथा होती़ मात्र मोदींना ती अजिबात रुचली नाही़