मिनी अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
ठाणे : राज्यभरात ११ हजार मिनी अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून त्यातील सेविकांना ७५० रुपये वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. यामुळे त्यांना आता दरमहा तीन हजार २५० रुपये मानधन मिळेल.
मिनी अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन
ठाणे: राज्यभरात ११ हजार मिनी अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून त्यातील सेविकांना ७५० रुपये वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. यामुळे त्यांना आता दरमहा तीन हजार २५० रुपये मानधन मिळेल.एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यात या मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने जुलै २०१३पासून या सेविकांना वाढीव मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार, राज्य शासनाने एप्रिल २०१४पासून मानधनवाढ घोषित केली. याबाबतचा आदेश शासनाने गेल्याच आठवड्यात जारी केला आहे़